शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक; ३०४ रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 20:32 IST

विदर्भात एकूण मृतांची संख्या १९० झाली आहे. विशेष म्हणजे, भंडाऱ्यातही आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली.

ठळक मुद्देरुग्णसंख्या ४८६२ दोन मृत्यूची नोंदमृतांची संख्या १९०

लोकमत न्यूज नेटवर्कलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात बुधवारी सर्वाधिक, सात मृत्यूची नोंद झाली असताना गुरुवारी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. ३०४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील १३७ रुग्ण नागपुरातील आहेत, तर याच जिल्ह्यातून दोन मृताचीही नोंद झाल्याने विदर्भात एकूण मृतांची संख्या १९० झाली आहे. विशेष म्हणजे, भंडाऱ्यातही आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचे निदान होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या तपासण्यांना वेग येण्यासाठी आता सर्वच जिल्ह्यात रॅपिड अ‍ॅण्टीजेन चाचणीला सुरुवात झाली आहे. यामुळे मोठ्या संख्येत चाचणी होत असून रुग्णसंख्याही वाढण्याची शक्यता आहे.

त्यानुसार नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांची रॅपिड तपासणी केली असता १३२ पॉझिटिव्ह आले. इतर ठिकाणाहूनही पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. नागपुरात रुग्णांची संख्या २०६४ झाली आहे. या शिवाय दोन रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३२ वर पोहचली आहे. १४०० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात ४९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या जिल्ह्यातील आतापर्यंतचा रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे. यातील बहुसंख्य रुग्ण हे साकोली येथील आहेत जिल्ह्यातील रुग्णसंख्या १५५ झाली आहे. अमरावती जिल्ह्यातही आज रुग्णांची संख्या वाढली. २९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ७७९ वर पोहचली आहे. अकोला जिल्ह्यात २१ रुग्णांची नोंद झाली असून आज मृत्यूची नोंंद झाली नसल्याने काहिसा दिलासा आरोग्य यंत्रणेला मिळाला आहे. येथील रुग्णसंख्या १८२८ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात १७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. येथील रुग्णसंख्या ३७७ झाली अहे.

वाशिम जिल्ह्यातही झपाट्याने रुग्ण वाढताना दिसून येत आहे. २० रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या १६९ वर पोहचली आहे. गडचिरोली जिल्ह्यात १४ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या १३८ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १४ कोरोनाबाधितांचे निदान झाले. रुग्णसंख्या १४८ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णसंख्या १९५झाली आहे. आज यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात रुग्णाची नोंद झाली नाही.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस