शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

हायव्होल्टेज मॅच, शेकडो कोटींचा सट्टा, पाकिस्तानवर पैसे लावणारे बुडाले, विराट सट्टेबाजारात ठरला ‘किंग’

By योगेश पांडे | Updated: February 24, 2025 00:05 IST

Nagpur News: चॅम्पिअन्स ट्रॉफीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अपेक्षेप्रमाणे विदर्भातूनच शेकडो कोटींचा सट्टा लागला. सामना सुरू होण्याच्या अगोदरच सट्टाबाजाराने भारताच्या विजयाचा अंदाज वर्तविला होता.

- योगेश पांडे नागपूर - चॅम्पिअन्स ट्रॉफीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अपेक्षेप्रमाणे विदर्भातूनच शेकडो कोटींचा सट्टा लागला. सामना सुरू होण्याच्या अगोदरच सट्टाबाजाराने भारताच्या विजयाचा अंदाज वर्तविला होता. पाकिस्तानच्या इनिंगमधील २८ ते ३३ ओव्हर्सदरम्यानचा कालावधी सोडला तर पूर्ण वेळ सट्टाबाजाराचा कल भारताकडेच होता. मात्र काही तरी वेगळे घडेल या आशेत ज्या सट्टेबाजांनी पाकिस्तानवर पैसे लावले त्यांना नुकसान सहन करावे लागले.

बुकींसाठी टीम इंडियाच पसंतीचा संघ होता. देशभरातील अनेक प्रमुख बुकींचे पंटर्स ऑनलाईन माध्यमांवरून सक्रिय झाले होते. सामना सुरू होण्याअगोदर मेन इन ब्लू संघाच्या बाजूने रुपयामागे ४७ पैसा व पाकिस्तानवर रुपयामागे १.९८ असा सट्टेबाजीचा दर होता.

सामना सुरू झाल्यावर पाकिस्तानची सुरुवात संथ झाली. मात्र मोहम्मद रिझवान व शकील यांनी १०४ धावांची भागिदारी केल्याने सट्टाबाजाराचा अंदाज चुकतो की काय अशा पोस्ट सोशल माध्यमांवर सुरू झाल्या होत्या. त्यावेळेस पाकिस्तानवर पैसे लागण्यास सुरुवात झाली होती. मात्र ३४ व्या ओव्हरमध्ये रिझवानचा बळी गेल्यावर परत जैसे थे चित्र झाले.अखेरपर्यंत खेळाडूंचे वैयक्तिक स्कोअर, पाकिस्तानच्या गोलंदाजांचे बळी यावर लगवाडी-खायवाडी सुरू होती.

ऑनलाईन लगवाडी-खायवाडीवर भरनागपूर पोलिसांनी, विशेषतः गुन्हे शाखेने, बेकायदेशीर सट्टेबाजीच्या कारवायांवर कारवाई करण्यासाठी त्यांची दक्षता वाढवली होती. सामन्यादरम्यान संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी व्यापक योजना आखली होती. बहुतांश सट्टेबाजी विविध ॲप्सच्या माध्यमावर चालते व त्यांचे आकडे सोशल माध्यमांवर व्हायरल होतात. अनेकांनी बेटिंग ॲप्सच्या माध्यमातून भारतावर पैसे लावले होते. काही संकेतस्थळावरूनदेखील हा प्रकार सुरू होता. त्याकडेदेखील पोलिसांचे लक्ष होते.

पंटर्सवर पोलिसांचा वॉचशहरातील जरीपटका, वर्धमाननगर, सेंट्रल एव्हेन्यू येथील अनेक तरुणांकडून लगवाडी खायवाडी करण्यात येते. तेथील पंटर्सवर पोलिसांची नजर होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातून पाचशे कोटींहून अधिकचा सट्टा लागला आहे.

शुभमन गिल, विराटवर बेटिंगशुभमन गिल हा सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरेल असे सट्टाबाजाराचे अंदाज होते व त्यावरदेखील जोरदार बेटिंग झाले. मात्र गिलवर पैसे लावणारे बुडाले. तर विराट कोहलीवर पैसे लावणारे मालामाल झाले. यासोबतच पाकिस्तान अडीचशेवर स्कोअर करेल की नाही, भारत टार्गेट ४० ओव्हर्सच्या आत पार करेल की नाही यावरदेखील जोरदार बेटिंग झाले.

टॅग्स :nagpurनागपूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान