नागपुरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:55 AM2019-03-11T10:55:33+5:302019-03-11T10:57:42+5:30

बजाजनगरातील एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा छडा लावून बजाजनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.

High profile sex racket trace out in Nagpur | नागपुरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा छडा

नागपुरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा छडा

googlenewsNext
ठळक मुद्देबजाजनगरात दोन वारांगना सापडल्यादोघांना अटक, सूत्रधार फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बजाजनगरातील एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा छडा लावून बजाजनगर पोलिसांनी विक्की देवानंद खोब्रागडे (वय २४, रा. इंदिरा मातानगर, हिंगणा) आणि रूपेश गौतम ठाकूर (वय २४, रा. राजीव नगर, हिंगणा) दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन तरुणींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या रॅकेटचा सूत्रधार स्वप्निल विजय गुप्ता (रा. बालाघाट) मात्र फरार झाला. बजाजनगरातील आशिष टॉवरच्या चौथ्या माळ्यावरील एका सदनिकेत आरोपी स्वप्निल विक्की आणि रुपेशच्या मदतीने कुंटणखाना चालवित होता. येथे दररोज नवनवीन तरुणी आणि व्यक्तींची गर्दी दिसत असल्याने बाजूच्यांना संशय आला. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बजाजनगर पोलिसांनी शहानिशा केली असता तेथे कुंटणखाना चालत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी पाठविलेल्या ग्राहकाने शनिवारी सायंकाळी स्वप्निलसोबत संपर्क साधला. त्याने ५ हजार रुपयांच्या बदल्यात तरुणी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. रक्कम हातात ठेवताच त्याने विक्की आणि रुपेशला इशारा केला. या दोघांनी ग्राहकाला दोन तरुणी दाखवल्या. त्यातील एकीला खोलीत नेल्यानंतर ग्राहकाने पोलिसांना इशारा केला. लगेच पोलिसांनी छापा मारून विक्की आणि रुपेशसह त्या दोघींना ताब्यात घेतले. या चौघांनी सागितलेल्या माहितीवरून या कुंटणखान्याचा सूत्रधार स्वप्निल गुप्ता असल्याचे स्पष्ट झाले. प्रफुल नारायण पवार यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी स्वप्निल विक्की आणि रुपेश या तिघांविरुद्ध अनैतिक व्यापास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंदविला. स्वप्नीलचा शोध घेतला जात आहे.
लकडगंजमध्येही दोघींना अटक
गंगाजमुना परिसरात रस्त्यावर उभ्या राहून अंगप्रदर्शन करणाऱ्या तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना अश्लील इशारे करणाऱ्या नितू अजाबसिंग धनावत (वय २३) तसेच रेखा अजाबसिंग धनावत (वय २५) या दोघींना लकडगंज पोलिसांनी अटक केली.
नितू आणि रेखा या दोघीही गंगाजमुना वस्तीतील कश्मिरीबाईच्या इमारतीत भाड्याने राहतात. गंगाजमुना परिसरात सिमेंट रोडवर उभ्या राहून त्या रस्त्याने जाणाऱ्या येणारांना अश्लील इशारे करीत असल्याचे पाहून शनिवारी रात्री ८ च्या सुमारास पोलिसांनी त्या दोघींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: High profile sex racket trace out in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.