लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी विधानसभा निवडणुकीला आव्हान देणाऱ्या प्रकरणांमध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार, देवराव भोंगळे (दोन्ही भाजप) व मनोज कायंदे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना समन्स जारी करून तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमधून विजयी झालेले मुनगंटीवार यांच्याविरुद्ध संतोषसिंग रावत (काँग्रेस), राजुरा येथून जिंकलेले भोंगळे यांच्याविरुद्ध सुभाष धोटे (काँग्रेस) तर, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून विजयी झालेले कायंदे यांच्याविरुद्ध डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. शिंगणे यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती वृषाली जोशी तर, इतर दोघांच्या याचिकेवर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
निवडणूक आयोगाने ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यापूर्वी विविध कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नाही. ईव्हीएमने निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होते.