नर्सिंग विद्यार्थिनींना हायकोर्टाचा दिलासा

By Admin | Updated: June 1, 2014 00:56 IST2014-06-01T00:56:50+5:302014-06-01T00:56:50+5:30

‘जनरल नर्सिंग मिडवायफरी’ या अभ्यासक्रमाच्या २0 विद्यार्थिनींना परीक्षेला बसू देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. हा आदेश विद्यार्थिनींसाठी दिलासादायक ठरला आहे.

High court relief to nursing students | नर्सिंग विद्यार्थिनींना हायकोर्टाचा दिलासा

नर्सिंग विद्यार्थिनींना हायकोर्टाचा दिलासा

नागपूर : ‘जनरल नर्सिंग मिडवायफरी’ या अभ्यासक्रमाच्या २0 विद्यार्थिनींना परीक्षेला बसू  देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. हा आदेश  विद्यार्थिनींसाठी दिलासादायक ठरला आहे.
पुलगाव (वर्धा) येथील आई सरस्वती बहुउद्देशीय महिला विकास संस्थेने इंडियन नर्सिंग  कौन्सिलचे प्रतिबंध झुगारून शैक्षणिक वर्ष २0१३-१४ मध्ये २0 विद्यार्थिनींना ‘जनरल नर्सिंग  मिडवायफरी’ अभ्यासक्रमात प्रवेश दिला आहे. या विद्यार्थिनींना परीक्षेला बसण्यास मनाई  करण्यात आल्यामुळे, संस्थेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. अभ्यासक्रमाची  परीक्षा ३ जूनपासून सुरू होणार आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने सर्व विद्यार्थिनींना परीक्षेला  बसू देण्याचा आदेश दिला आहे. परंतु          पूर्वपरवानगीशिवाय निकाल जाहीर करू नका, असे  स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील सुनावणी २३ जून रोजी निश्‍चित करण्यात आली आहे.  (प्रतिनिधी)
 

Web Title: High court relief to nursing students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.