हायकोर्ट :मेडिकल प्रादेशिक कोट्यावर होईल फिजिकल सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 11:49 PM2020-11-06T23:49:47+5:302020-11-06T23:52:19+5:30

Physical hearing to be held on medical regional quota in High Court वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील प्रादेशिक कोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेवर फिजिकल सुनावणी होणार आहे.

High Court: Physical hearing to be held on medical regional quota | हायकोर्ट :मेडिकल प्रादेशिक कोट्यावर होईल फिजिकल सुनावणी

हायकोर्ट :मेडिकल प्रादेशिक कोट्यावर होईल फिजिकल सुनावणी

Next
ठळक मुद्दे  विशेष न्यायपीठ स्थापन केले जाईल

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील प्रादेशिक कोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेवर फिजिकल सुनावणी होणार आहे. याकरिता विशेष न्यायपीठ स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींना अर्ज सादर करण्यात आला आहे.

निकिता लखोटिया या विद्यार्थिनीने ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. दरम्यान, काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे न्यायालयाने या प्रकरणावर फिजिकल सुनावणी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून याचिकाकर्तीला याकरिता मुख्य न्यायमूर्तींना अर्ज सादर करण्यास सांगितले. त्यानुसार, याचिकाकर्तीने मुख्य न्यायमूर्तींना अर्ज सादर केला आहे.

राज्य सरकारने ७ सप्टेंबर २०२० रोजी प्रादेशिक कोटा रद्द करण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यावर याचिकाकर्तीचा आक्षेप आहे. हा निर्णय अवैध, एकतर्फी व समानतेच्या अधिकाराचे उल्लघन करणारा आणि विदर्भ व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला बाधा पोहचविणारा आहे असे तिचे म्हणणे आहे. हा वादग्रस्त निर्णय रद्द करून जुन्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी विनंती तिने न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्तीतर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी व ॲड. अश्विन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: High Court: Physical hearing to be held on medical regional quota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.