शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

हायकोर्ट न्यायमूर्तींनी स्वत: केली नागपुरातील हेरीटेज कस्तुरचंद पार्कची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 15:44 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे व न्या. पुष्पा गणेडीवाला यांनी शनिवारी सकाळी ११.३० वाजता सिव्हिल लाईन्स येथील हेरीटेज कस्तुरचंद पार्कला स्वत: भेट देऊन दूरावस्थेची पाहणी केली.

ठळक मुद्देदूरावस्थेवर नाराजी व्यक्त केली मैदान व स्मारकाची दुरुस्ती करण्यास सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे व न्या. पुष्पा गणेडीवाला यांनी शनिवारी सकाळी ११.३० वाजता सिव्हिल लाईन्स येथील हेरीटेज कस्तुरचंद पार्कला स्वत: भेट देऊन दूरावस्थेची पाहणी केली. दरम्यान, प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी कस्तुरचंद पार्कच्या दूरावस्थेवर नाराजी व्यक्त केली. हे मैदान व मैदानावरील स्मारक हेरीटेज असल्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, मैदान व स्मारकाची तातडीने दुरुस्ती करून त्यांना पूर्वस्थितीत आणण्यास सांगितले.उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये कस्तुरचंद पार्कच्या दूरावस्थेची दखल घेऊन स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. ती याचिका तेव्हापासून प्रलंबित आहे. या संपूर्ण काळात हायकोर्ट न्यायमूर्तींनी शनिवारी पहिल्यांदाच कस्तुरचंद पार्कला स्वत: भेट देऊन दूरावस्थेची पाहणी केली. त्यामुळे न्यायमूर्तींचा हा पुढाकार प्रशंसनीय व आकर्षनाचे केंद्र ठरला. यापूर्वी न्यायालयाने वेळोवेळी आवश्यक निर्देश देऊन मैदानावरील अतिक्रमण हटवले. मैदानावरील व्यावसायिक कार्यक्रम बंद केले. मैदानाची दुरुस्ती करायला लावली. परंतु, सध्या मेट्रो स्टेशन व अन्य सौंदर्यीकरणाच्या कामांमुळे मैदानाची खूप दूरावस्था झाली आहे. मैदानावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी झाडेझुडपे वाढली आहेत. जड वाहनांच्या जाण्यायेण्यामुळे मैदान खराब झाले आहे. परिणामी, मैदानावरील खेळ बंद झाले आहेत.

जनहित याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी न्यायालय मित्र म्हणून नियुक्त करण्यात आलेले अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी गेल्या बुधवारी न्यायालयामध्ये कस्तुरचंद पार्कच्या दूरावस्थेची छायाचित्रे सादर करून न्यायालयाच्या ताज्या आदेशांची प्रशासनाने अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप केला होता. प्रशासनाने हा आरोप खोडून काढला होता. त्यामुळे न्यायमूर्तींनी स्वत: मैदानाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी शनिवारी मैदानाची पाहणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., न्यायालय मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, मनपाचे वकील अ‍ॅड. जेमिनी कासट, सरकारी वकील अ‍ॅड. दीपक ठाकरे यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. न्यायमूर्तींनी पाहणीदरम्यान लक्षात आणून दिलेल्या विविध दूरावस्थेची मनपाने नोंद घेतली आहे. त्याचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. याशिवाय अ‍ॅड. भांडारकर स्वतंत्र अहवाल सादर करणार आहेत. उच्च न्यायालय सदर प्रकरणावरील पुढील सुनावणीमध्ये या पाहणीच्या आधारावर प्रशासनाला आवश्यक आदेश जारी करतील. 

 

टॅग्स :Kasturchand Parkकस्तूरचंद पार्क