शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

हायकोर्टाने ठरवली देशी दारू नियमातील दुरुस्ती अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:01 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये बुधवारी राज्य शासनाला जोरदार धक्का बसला. न्यायालयाने महाराष्ट्र देशी दारू नियम-१९७३ मधील दुरुस्तीची अधिसूचना अवैध ठरवून रद्द केली. त्यामुळे देशी दारू विक्रेत्यांना जुन्याच नियमानुसार अनुज्ञप्त्या द्याव्या लागणार आहेत.

ठळक मुद्देराज्य शासनाला जोरदार धक्का

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये बुधवारी राज्य शासनाला जोरदार धक्का बसला. न्यायालयाने महाराष्ट्र देशी दारू नियम-१९७३ मधील दुरुस्तीची अधिसूचना अवैध ठरवून रद्द केली. त्यामुळे देशी दारू विक्रेत्यांना जुन्याच नियमानुसार अनुज्ञप्त्या द्याव्या लागणार आहेत.वादग्रस्त अधिसूचनेविरुद्ध महाराष्ट्र राज्य दारू विक्रेता महामंडळ व इतरांनी याचिका दाखल केल्या होत्या. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी याचिका मंजूर केल्या. शासनाने नियम २४ मध्ये दुरुस्ती करून पार्किंगसाठी जागा, इमारत परवाना, विविध प्रकारची नाहरकत प्रमाणपत्रे इत्यादी बाबींची पूर्तता करणाºयालाच देशी दारू विक्रीची अनुज्ञप्ती देण्याची तरतूद केली होती. यासंदर्भात १ सप्टेंबर २०१७ रोजी वादग्रस्त अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता. नवीन अटी यावर्षीपासून लागू करता येणार नाही. या अटी २०१८ पासून अंमलात आणायला पाहिजे असा दावा त्यांनी केला होता. हे प्रकरण प्रलंबित असताना न्यायालयाने नवीन तरतुदींची पूर्तता करण्याचा याचिकाकर्त्यांना आग्रह करू नये व त्यांच्या अनुज्ञप्त्यांचे जुन्या नियमानुसार नूतनीकरण करावे असा अंतरिम आदेश दिला होता. तो आदेश आता कायम झाला आहे. असे असले तरी राज्य शासन कायद्यानुसार नवीन अधिसूचना जारी करण्यास मोकळे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी, अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण, अ‍ॅड. सुमित बोडलकर, अ‍ॅड. विक्रम उंदरे आदींनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयliquor banदारूबंदी