शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्यास हायकोर्टाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 6:43 AM

हजारो विद्यार्थ्यांना दिलासा : नागपूर खंडपीठाचा निर्णय

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमधील निर्वाह भत्ता अदा करण्याची केंद्र सरकारला मुभा दिली. त्यामुळे देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणावर न्यायमूर्ती रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २०१२ मधील योजना लागू असताना शिष्यवृत्तीमधील प्रवेश व शिक्षण शुल्काची रक्कम शाळा, महाविद्यालये व संस्थांच्या तर, निर्वाह भत्त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केली जात होती. दरम्यान, कोट्यवधी रुपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा उघडकीस आला. शिक्षण संस्था बोगस प्रवेश दाखवून शिष्यवृत्ती मिळवित असल्याचे तपासात आढळून आले. त्यामुळे २०१४-१५ शैक्षणिक सत्रापासून धोरणात बदल करण्यात आला. शिष्यवृत्तीची संपूर्ण रक्कम विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भात २ जून २०१४ रोजी आदेश जारी करण्यात आला. त्याविरुद्ध विदर्भ अल्पसंख्याक शिक्षण संस्था महासंघ व शाहबाबू शिक्षण संस्था यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. शिष्यवृत्तीची संपूर्ण रक्कम विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केल्यास विद्यार्थी शाळा, महाविद्यालये व संस्थांना प्रवेश व शिक्षण शुल्क देणार नाहीत किंवा ही रक्कम देण्यासाठी विलंब करतील. त्यामुळे शिक्षण संस्थांना शाळा-महाविद्यालये चालविणे कठीण जाईल. परिणामी, प्रवेश व शिक्षण शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येऊ नये. त्यांना केवळ निर्वाह भत्ता अदा करण्यात यावा, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.शिक्षण शुल्क थांबवण्याचा आदेश कायमउच्च न्यायालयाने वेळोवेळी आवश्यक आदेश दिल्यानंतर १३ आॅक्टोबर रोजी शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास मनाई केली होती. हा मुद्दा मंंंंगळवारी निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने १३ आॅक्टोबरच्या अंतरिम आदेशात बदल केला. केंद्र सरकारला शिष्यवृत्तीमधील निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मुभा देण्यात आली. परंतु, प्रवेश व शिक्षण शुल्क थांबवून ठेवण्याचा आदेश कायम ठेवला.

टॅग्स :Courtन्यायालयMumbaiमुंबई