रेल्वेस्थानकावर ‘हाय अलर्ट’
By Admin | Updated: June 30, 2014 00:41 IST2014-06-30T00:41:26+5:302014-06-30T00:41:26+5:30
मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकावर बॉम्बस्फोट होणार असल्याचा निनावी दूरध्वनी रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात आला. त्यानंतर मुंबई आरपीएफ कार्यालयातून मध्य रेल्वेच्या

रेल्वेस्थानकावर ‘हाय अलर्ट’
नागपूर : मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकावर बॉम्बस्फोट होणार असल्याचा निनावी दूरध्वनी रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात आला. त्यानंतर मुंबई आरपीएफ कार्यालयातून मध्य रेल्वेच्या सर्वच विभागांना दूरध्वनीवरून हाय अलर्ट जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे रविवारी रात्री १२ वाजेपासून नागपूर रेल्वेस्थानकावर कडक बंदोबस्त लावण्यात आला. यात श्वानपथक आणि बीडीडीएसच्या पथकाद्वारे नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीची कसून तपासणी करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांचा तगडा बंदोबस्त नागपूर रेल्वेस्थानकावर लावण्यात आला.
श्वानपथकासह बॉम्बशोधक आणि नाशक पथकाद्वारे नागपूरातून ये-जा करणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीची कसून तपासणी करण्यात आली. रात्री १२ वाजेपासून सकाळी ७ पर्यंत प्रत्येक रेल्वेगाडीची तपासणी करण्यात आली. परंतु पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. शनिवारी सायंकाळपासून रेल्वे भर्ती बोर्ड बिलासपूरतर्फे नागपुरात आयोजित परीक्षेसाठी विविध राज्यातून हजारो उमेदवार नागपुरात आले होते. या सर्व उमेदवारांनी नागपूर रेल्वेस्थानकावरच मुक्काम ठोकल्यामुळे उमेदवारांची मोठी गर्दी नागपूर रेल्वेस्थानकावर होती.
एवढ्या गर्दीचा फायदा आतंकवादी सहज घेऊ शकतात, ही भीतीही सुरक्षा यंत्रणेला होती. त्यामुळे रविवारी रात्री डोळ््यात तेल घालून रेल्वेस्थानकाचा काना-कोपरा पिंजून काढण्यात आला. रविवारी दिवसाही रेल्वेस्थानक परिसरात पोलीस गस्त घालताना आढळून आले.(प्रतिनिधी)