शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हायटेक वंदे भारत आता नागपूर ते हैदराबाद मार्गावर, मंत्री, खासदार यांच्या पाठपुराव्याला यश

By नरेश डोंगरे | Updated: May 26, 2023 14:33 IST

लवकरच मिळणार ग्रीन सिग्नल

नागपूर : देशातील हायटेक ट्रेन मानली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस आता नागपूर - हैदराबादरेल्वे मार्गावर धावणार आहे. सत्तापक्षातील मंत्री, खासदार यांनी या संबंधाने पाठपुरावा केला होता. त्याला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे लवकरच नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे.

५१८ किलोमिटर अंतराच्या हैदराबाद शहरात जाण्यासाठी नागपूरहून सध्या १० ते ११ तास लागतात. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास सुमारे पाच तासांचा वेळ वाचेल.

महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडणाऱ्या नागपूर - हैदराबाद रेल्वेमार्गावर जवळपास प्रत्येकच रेल्वेगाडी हाऊसफुल्ल असते. दक्षिण भारतातील प्रवाशांचा या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भरणा असतो. त्यामुळे नागपूर मार्गे बऱ्याचशा रेल्वेगाड्या या लोहमार्गावर धावत असतात. मात्र, लांब पल्ल्याच्या या प्रवासाला प्रदीर्घ वेळ लागत असल्याने अनेक शहरातील प्रवासी रेल्वेऐवजी विमानाने प्रवास करने पसंत करतात. या पार्श्वभूमीवर, देशाचे मध्यस्थळ असलेल्या नागपूरहून हैदराबादला जाण्यासाठी वंदे भारत सारखी सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण रेल्वेगाडी सुरू व्हावी, अशी हजारो प्रवाशांची ईच्छा होती.

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे कागदोपत्री पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले असून लवकरच नागपूर हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून या संबंधाने अधिकृत माहिती मिळालेली नाही.

अनेक जिल्ह्यातील प्रवाशांना लाभ

ही गाडी सुरू झाल्यास नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील प्रवाशांना त्याचा विशेष फायदा होईल. कमी वेळेत तेलंगणाचा प्रवास करने सुविधाजनक होईल. सोबतच जबलपूर, रायपूरसाठीही रेल्वेची कनेक्टीव्हिटी मिळेल. सूत्रांच्या मते, नागपूर- हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे ठरले असले तरी ती कधीपासून धावणार त्याचा मुहूर्त अद्याप निश्चित झाला नसल्याचे समजते.

सेवाग्रामलाही मिळणार थांबा

तूर्त ही गाडी नागपूरहून बल्लारपूर, शिरपूर, रामगुंडम, काझीपेठ आदी स्थानकावर थांबे घेऊन हैदराबादला पोहचेल. मात्र, या स्थानकांसोबतच वंदे भारतचा थांबा सेवाग्राम आणि हिंगणघाट रेल्वेस्थानकावरही दिला जावा, अशी मागणी खास. तडस यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे केली आहे.  सध्या नागपूर ते जबलपूर या मार्गावर वंदे भारत धावते. प्रस्तावित नागपूर हैदराबाद सुरू झाल्यास नागपूरहून धावणारी ही दुसरी वंदे भारत ठरेल.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूरhyderabad-pcहैदराबादrailwayरेल्वे