सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:51+5:302021-04-09T04:08:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : कोरोनाचा वाढता प्रकोप नागरिकांसाठी चांगलाच अडचणींचा ठरत आहे. अशावेळी लसीकरण मोहीमसुद्धा अधिक प्रभावीपणे राबविणे ...

To help the workers of the charitable organization | सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते मदतीला

सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते मदतीला

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : कोरोनाचा वाढता प्रकोप नागरिकांसाठी चांगलाच अडचणींचा ठरत आहे. अशावेळी लसीकरण मोहीमसुद्धा अधिक प्रभावीपणे राबविणे गरजेचे झाले आहे. आरोग्यसेवक, आशावर्कर, परिचारिका, शिक्षक आणि इतर कर्मचारी जीवाची बाजी लावत लसीकरण मोहीम नियोजनबद्ध पार पाडत आहेत. त्यांच्या दिमतीला आता स्थानिक सेवाभावी संस्थेचे कार्यकर्तेसुद्धा धावत आहेत.

स्थानिक उमरेड यूथ फाऊंडेशनच्या सदस्यांनी संत जगनाडे महाराज सभागृह येथे सेवाकार्य केले. नूतन प्राथमिक शाळेत पार पडलेल्या लसीकरणाच्या व्यवस्थेसाठी नगरसेवक महेश भुयारकर, मनीष शिंगणे यांनी पुढाकार घेतला. गांगापूर-कावरापेठ परिसरात जितेंद्र गिरडकर, राजेश भेंडे आदींनी नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. स्व. आ. ला. वाघमारे प्राथमिक शाळेत रितेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते कामाला लागले. एकूणच उमरेड शहरात विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते लसीकरणासाठी आपली सेवा प्रदान करीत असल्याने आरोग्य विभागाने समाधान व्यक्त केले आहे. सुरेश पौनीकर, सतीश कामडी, प्रकाश मोहोड, राकेश नौकरकर, महेश लांजेवार, चेतन पडोळे, मनोज चाचरकर, बालाजी मुगले, अमोल खोब्रागडे, आकार बनकर, अभि हरडे, अनिता वानखेडे, रक्षा ठाकरे, विशाखा मेश्राम, सविता क्षीरसागर आदींनी सहकार्य केले.

Web Title: To help the workers of the charitable organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.