शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
3
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
4
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
5
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
6
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
7
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
8
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
9
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
10
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
11
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
12
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
13
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
14
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
15
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
16
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
17
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
18
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
19
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
20
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

शहरातील गरजूंना आवश्यक मदत करा : फडणवीस यांची भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:43 AM

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘ऑडियो ब्रिज’च्या माध्यमातून भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. ‘कोरोना’च्या लढ्यात सरकारी यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे व शहरातील गरजूंपर्यंत वेळेत पोहोचावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ठळक मुद्दे‘कोरोना’च्या लढ्यात सरकारी यंत्रणेला मदत करण्याचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘ऑडियो ब्रिज’च्या माध्यमातून भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी दक्षिण-पश्चिम नागपूरच्या पदाधिकाऱ्यांशीदेखील मुंबईतून संवाद साधला. नागपूर शहरातील जंतुनाशक फवारणी, औषध पुरवठा, याबाबत त्यांनी पदाधिकारी व नगरसेवकांशी चर्चा केली. ‘कोरोना’च्या लढ्यात सरकारी यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे व शहरातील गरजूंपर्यंत वेळेत पोहोचावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.गुरुवारी दुसऱ्या टप्प्यात फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक आणि शक्तीकेंद्र प्रमुखांशी संवाद साधला. यात नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि सुमारे हजार पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते. नागपूर शहरातील जंतुनाशक फवारणी, गरजूंना अन्नवाटपाची स्थिती, औषध पुरवठा, सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात उपलब्धता इत्यादींबाबत त्यांनी सविस्तर चर्चा पदाधिकाºयांशी केली आणि प्रदेश स्तरावरील यंत्रणेशी संपर्क ठेवत समन्वयाने वरील सर्व क्षेत्रात काम करण्याच्या सूचना केल्या. कार्यकर्त्यांच्या विविध प्रश्नांना, शंकांनासुद्धा त्यांनी यावेळी उत्तरे दिली.राज्याचादेखील घेतला आढावा‘कोरोना’संदर्भात भाजपातर्फे सर्वच जिल्ह्यांत आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेचा आढावा आणि आणखी काय सुधारणा करता येईल, यासंदर्भात फडणवीस यांनी चर्चा केली. राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, प्रदेश भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक या ऑडिओ ब्रिजला उपस्थित होते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारी यंत्रणेला मदत करीत अधिकाधिक लोकांना मदत करण्याबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले.नऊ गरीबकुटुंबे दत्तक घ्यावीत‘कोरोना’मुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. ही सारी कामे करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक जिल्ह्यात लोकांना भाजपाची एक हेल्पलाईन सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने नऊ परिवार दत्तक घेऊन त्यांना मदत करायची आहे, अशी स्पष्ट सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस