शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

बुद्धपौर्णिमेला गरजूंना मदत करा : भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 19:09 IST

तथागत गौतम बुद्ध यांनी शांती, मैत्री, करुणा आणि कल्याणाचा मार्ग सांगितला. त्याच मार्गाचा अवलंब करीत बुद्धपौर्णिमेला गरजूंना मदत करा, बुद्धजयंती सामूहिकरीत्या साजरी करू नका, घरीच बसून ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन करा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले आहे.

ठळक मुद्देजयंतीला ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’चे करा वाचन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्ध यांनी शांती, मैत्री, करुणा आणि कल्याणाचा मार्ग सांगितला. त्याच मार्गाचा अवलंब करीत बुद्धपौर्णिमेला गरजूंना मदत करा, बुद्धजयंती सामूहिकरीत्या साजरी करू नका, घरीच बसून ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन करा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले आहे. ७ मे रोजी बुद्धजयंती आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असून गरिबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा संकटकाळी समाजाची जबाबदारी वाढली आहे. ज्यांची आर्थिक स्थिती भक्कम आहे, अशा प्रत्येकांनी एका कुटुंबाची मदत करावी. हीच खरी बुद्धजयंती ठरेल, असेही ससाई म्हणाले.शहरातील शेकडो बुद्धविहारांत जयंती साजरी केली जाते. काही ठिकाणी खीरदान, भोजनदान आणि खाद्यपदार्थांचे वितरण केले जाते. मात्र, कोरोनाच्या संकटाला मूठमाती देण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी खबरदारी घ्यायची आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये सामूहिक पद्धतीने जयंती साजरी करू नका. शहरातील सर्व बुद्धविहार कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी याची खबरदारी घ्यावी. घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर त्रिशरण व पंचशील ग्रहण करून बुद्धजयंती साजरी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.बॉक्स...लॉकडाऊनपर्यंत जेवणाचे डबेभदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या मार्गदर्शनात इंदोरा बुद्धविहार कमिटीतर्फे सकाळ-सायंकाळ गरजू आणि गरिबांना जेवणाचे डबे वाटप केले जात आहेत. दररोज ५ हजार जेवणाचे डबे तयार करून विहाराच्या वाहनाने गरजवंतांपर्यंत पोहोचविले जात आहेत. १० एप्रिलपासूनचा हा उपक्रम लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू राहील.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमाnagpurनागपूर