कारागृहात गांजाचा पुरवठा

By Admin | Updated: April 29, 2015 02:44 IST2015-04-29T02:44:03+5:302015-04-29T02:44:03+5:30

चपलांमध्ये गांजा लपवून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पुरवठा करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे.

Heavy supply of jute | कारागृहात गांजाचा पुरवठा

कारागृहात गांजाचा पुरवठा

नागपूर : चपलांमध्ये गांजा लपवून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पुरवठा करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. सोमवारी अजनी चौकातील माऊंट कार्मेल शाळेजवळ तिघांना गांजासह ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून ५२,३२० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून करण्यात आली.
अटक करण्यात आलेले आरोपी अमोल राजेश बोदेले (१८) रा. धरमपेठ बुद्ध विहार, निशिकांत भीमराव टेमरे (३०) रा. जयनगर पांढराबोडी व अक्षय हनुमंत बुत्तलवार (१९) रा. अंबाझरी हिलटॉप आहेत. हे तिघेही आरोपी सोमवारी दुपारी दुचाकी वाहनावर जात असताना, पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता, दुचाकीच्या डिक्कीतून २४८ ग्राम गांजा मिळाला. पोलिसांना अक्षयच्या चप्पलमध्येही गांजा असल्याचा संशय आला. चप्पल कापून बघितली असता त्यातून १२५ ग्राम गांजा मिळाला. पोलिसांनी तिघांनाही अटक करून, अधिक चौकशी केली असता, कारागृहात गांजाचा पुरवठा करण्यात येत असल्याचा खुलासा त्यांनी केला. हे आरोपी या व्यवसायात सक्रिय असल्याची माहिती आहे. कारागृहाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने गांजाचा पुरवठा करण्यात येत होता. या कारवाईमुळे कैद्याच्या पलायनानंतरही कारागृहाची अवस्था सुधारणार नाही, असेच दिसतेय.
ही कारवाई गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर, निरीक्षक पंडितराव सोनवणे, हवालदार गजानन ठाकूर, शिपाई गणेश घुगुलकर, किशोर महंत, नितीन तिवारी, सतीश पाटील, नरेश शिंगणे व रुबिना यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Heavy supply of jute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.