शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

नागपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; उकाड्याने हैरान नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2022 12:09 IST

काल रात्री अचानक पावसाच्या सरी पडल्याने वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त नागरिकांनाही थोडा दिलासा मिळाला आहे. 

नागपूर : नागपूरमध्ये बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. उष्णतेने अंगाची काहीली होत आहे. मात्र, काल रात्री अचानक पावसाच्या सरी पडल्याने वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त नागरिकांनाही थोडा दिलासा मिळाला आहे. 

नागपूरसह गेल्या चार दिवसांपासून तापमानात चढ-उतार सुरू आहे. पारा कधी ४५ पेक्षा अधिक तर कधी ४० पेक्षा खाली उतरत आहे. बुधवारी पुन्हा कमाल तापमान १.६ अंशाने घसरून ४१.८ अंशावर पोहोचले. आकाशात दाटलेले ढग व तापमानात चढ-उतार होत असल्याने दमट वातावरणामुळे नागपूरकर हैराण झालेत. अशातच बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्याला प्रारंभ झाला. विजांच्या गडगडाटात माेठ्या थेंबाच्या पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड ते दोन तास वादळी पाऊस काेसळत हाेता.  

दरम्यान, राज्यातील कोकण किनारपट्टी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तर, विदर्भाच्या भागात उष्णतेची लाट कायम असणार आहे.

टॅग्स :weatherहवामानRainपाऊसnagpurनागपूर