शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

धोधो पावसाने विदर्भात हजेरी; वाशिमच्या मालेगावात सर्वाधिक 145.1 मि.मी. पाऊस

By निशांत वानखेडे | Updated: June 26, 2025 20:07 IST

28 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम! : हवामान विभागाचा अलर्ट जारी

नागपूर : दाेन दिवसांपासून हळुवार सुरू असलेल्या पावसाने गुरुवारी तिसऱ्या दिवशी चांगलाच वेग घेतला.  विदर्भात बुधवारी रात्री सर्वदूर धाे-धाे पाऊस काेसळला. गुरुवारी दिवसभर पूर्व विदर्भात उघडीप दिली पण पश्चिम  विदर्भात पावसाचा धुमाकूळ कायम हाेता. विशेषत: वाशिम, अकाेला, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. 

बुधवारी दिवसभर शांत राहिलेल्या पावसाला सायंकाळपासून चांगलाच जाेर चढला. नागपूर शहरात रात्री १०.३० ते ११.३० पर्यंत तासभर धाे-धाे सरी बरसल्या. गुरुवारी सकाळपर्यंत शहरात ३२.४ मि.मी. पावसाची नाेंद झाली.  जिल्ह्यात सावनेर तालुक्यात सर्वाधिक ५६ मि.मी. पाऊस झाला. दिवसभर मात्र ढग शांत राहिले. पावसाची सर्वाधिक तीव्रता यवतमाळ व वाशिम जिल्ह्यात बघायला मिळाली. वाशिममध्ये सकाळी ८.३० पर्यंत १२२.४ मि.मी. पावसाची नाेंद झाली आहे. मुसळधार पावसाची तीव्रता दिवसभर कायम हाेती. येथे दिवसा ७३ मि.मी. पाऊस झाला. वाशिमच्या मालेगाव भागात विदर्भात सर्वाधिक १४५.१ मि.मी. पावसाची नाेंद झाली. यवतमाळ शहरात सकाळपर्यंत ६६.६ मि.मी. पाऊस झाला. दिवसासुद्धा पावसाची संततधार सुरू हाेती. या जिल्ह्यातील घाटंजी सर्कलमध्ये १२९.७ मि.मी. पावसाची  नाेंद झाली आहे. 

अकाेला आणि वर्धा जिल्ह्यालाही गुरुवारी दिवसभर पावसाने धुम केली. सायंकाळपर्यंत अकाेल्यात ६९ मि.मी. आणि वर्ध्यात ५४ मि.मी. पाऊस झाला. बुलढाण्यात रात्री ४७ मि.मी आणि दिवसभर १८ मि.मी.पावसाची नाेंद झाली आहे. भंडारा व गाेंदिया जिल्ह्यातही पावसाची चांगली हजेरी लागली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाची ही तीव्रता आणखी दाेन दिवस २८ जूनपर्यंत कायम राहणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरVidarbhaविदर्भmonsoonमोसमी पाऊसRainपाऊस