शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

मुसळधार पावसाचा फटका : एक विमान रद्द, मुंबईतून येणाऱ्या विमानाला चार तास विलंब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 8:12 PM

मुसळधार पावसामुळे मुंबईहून नागपुरात सकाळी येणाऱ्या तीन विमानांना विलंब झाला. तर एअर इंडियाचे सकाळी ७.२० वाजता नागपुरात येणारे एआय ६२६ मुंंबई-नागपूर विमान रद्द करण्यात आले. गो एअरचे विमान तब्बल चार तास उशिरा नागपुरात पोहोचले. देशाच्या अन्य भागातून नागपुरात येणारी एकूण सहा विमाने दुपारी १.३० पर्यंत उशिरा पोहोचली. त्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

ठळक मुद्देमुंबईत एक धावपट्टी बंद 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुसळधार पावसामुळे मुंबईहून नागपुरात सकाळी येणाऱ्या तीन विमानांना विलंब झाला. तर एअर इंडियाचे सकाळी ७.२० वाजता नागपुरात येणारे एआय ६२६ मुंंबई-नागपूर विमान रद्द करण्यात आले. गो एअरचे विमान तब्बल चार तास उशिरा नागपुरात पोहोचले. देशाच्या अन्य भागातून नागपुरात येणारी एकूण सहा विमाने दुपारी १.३० पर्यंत उशिरा पोहोचली. त्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. 

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळी मुंबईत स्पाईस जेट कंपनीचे विमान धावपट्टीवरून घसरल्यामुळे या धावपट्टीवरील वाहतूक दुपारी २ पर्यंत बंद करण्यात आली होती. त्यामुळे कोणतेही विमान उतरले नाही. दुसऱ्या धावपट्टीवरून केवळ विमानांच्या उड्डाणांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे सकाळी ७.३० पर्यंत ३७ विमाने इतरत्र वळविण्यात आली.याशिवाय सोमवारी रात्री २.१० वाजता पुणे येथून नागपुरात येणारे इंडिगोचे ६ई २८९४ हे विमान १.४३ तास उशिरा अर्थात ३.५५ वाजता आले. तसेच एअर अरेबियाचे जी९ ४१६ शारजाह-नागपूर विमान २६ मिनिटे उशिरा पहाटे ४.१० ऐवजी ४.३० वाजता, गो एअरचे जी८ २६०१ मुंबई-नागपूर विमान सकाळी ८.१५ ऐवजी दुपारी १२.२० वाजता म्हणजेच तब्बल ४ तास ५ मिनिटांनी उशिरा आले. तसेच नागपुरात येणाऱ्या विमानांमध्ये इंडिगोचे ६ई २०१७ दिल्ली-नागपूर विमान १७ मिनिटे उशिराने, इंडिगोचे ६ई ४८२ मुंबई-नागपूर विमान सकाळी ९.५५ ऐवजी ३.२० तास उशिरा दुपारी १.१५ वाजता पोहोचले. याशिवाय इंडिगोच्या मुंबई-नागपूर ६ई ५३८८ विमान दुपारी १.२५ ऐवजी २.१० मिनिटे उशिराने आले. तर नागपुरातून मुंबईला जाणारे गो एअरचे जी८ २६०२ विमान २.१० तास उशिरा दुपारी १२.५८ ऐवजी २.२४ वाजता पोहोचले.

नागपूर धावपट्टीचे लाईट शॉटसर्किटने बंद  : दुबई-मुंबई विमान नागपुरात उतरले         

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे लाईट शॉर्ट सर्किटमुळे चार तास बंद असल्यामुळे नागपुरात येणारी काही विमाने हैदराबादला वळविण्यात आली. मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळाची एक धावपट्टी दुपारी २ पर्यंत बंद करण्यात आल्यामुळे मुंबईची काही विमाने नागपुरात वळविण्यात आली. चार विमाने रद्द करण्यात आली आणि काही विलंबाने नागपुरात पोहोचली. कतार एअरवेजचे क्यूआर-५९० दोहा-नाागपूर विमान हैदराबादला वळविण्यात आले. यामुळे क्यूआर ५९१ नागपूर-दोहा विमान (मंगळवारी सकाळी ३.४० वाजता) रद्द करण्यात आले. मुंबईत मुसळधार पावसामुळे ६ई ०६२ दुबई-मुंबई विमान नागपुरात वळविण्यात आले. नागपुरशी सबंधित पाच उड्डाने रद्द करण्यात आली तर एकूण सहा विमाने वळवून नागपुरात उतरविण्यात आली. नागपूर विमानतळाच्या धावपट्टीवरील लाईट पहाटे ४ वाजता सुरळीत करण्यात आले, पण त्यापूर्वीच धावपट्टीवर अंधार असल्यामुळे इतरत्र वळविण्यात आली. 

टॅग्स :GoAirगो-एअरDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर