हृदयी वसंत फुलताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:09 IST2021-02-16T04:09:43+5:302021-02-16T04:09:43+5:30

आज वसंतपंचमी अर्थात जुनी जळमटे टाकून नवतीकडे मार्गस्थ करणाऱ्या शिशिराची आणि वसंताची ऋतुसंधी. ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर या ...

Heart spring blooms | हृदयी वसंत फुलताना

हृदयी वसंत फुलताना

आज वसंतपंचमी अर्थात जुनी जळमटे टाकून नवतीकडे मार्गस्थ करणाऱ्या शिशिराची आणि वसंताची ऋतुसंधी. ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर या पाचही ऋतूंचा अर्क असलेला वसंत आजपासून प्रारंभ होत आहे. ज्याप्रमाणे संपूर्ण भावनांचा रस प्रेमात असतो, अगदी त्याचप्रमाणे वसंताची योजना निसर्गाने केली आहे. म्हणूनच, या ऋतूला भारतीय संस्कृतीत प्रेमऋतू असेही म्हटले जाते. निसर्गात, वृक्षवेलींच्या स्वरूपात झालेले बदल हा वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत आहे. शिशिरात झालेल्या पर्णगळतीनगर वृक्षवेलींना उगवलेली नवी पालवी, आंबा-चिकूसारख्या वृक्षफळांना आलेला बहार, मोगरा आदी पुष्परोपट्यांना उगवलेल्या नव्या कळ्या सारे सारेच नवाकर्षक आहेत. एका अर्थाने प्रेमात पडल्यावर वाटणारा तजेला हा ऋतूस्पर्श करवून देतो. ‘हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे...’ ही माफक अपेक्षा हा ऋतू प्रत्येकाच्या मनात उंचबळवतो.

- छायाचित्र - मुकेश कुकडे

Web Title: Heart spring blooms