नागपूर : नागपूर, वर्धा व बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या प्रकरणावर ११ आॅगस्ट रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. आर्थिक अडचणींमुळे ४ टक्के भांडवल पर्याप्ततेची (सीआरएआर) अट पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे रिझर्व्ह बँकेने गेल्या ९ मे रोजी ‘बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट-१९४९’च्या कलम २२(५) अन्वये तिन्ही बँकांचे बँकिंग परवाना अर्ज फेटाळून बँकिंग व्यवहार थांबविण्याचे आदेश दिले आहेत. याविरुद्ध बँकांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने रिझर्व्ह बँकेच्या आदेशावर अंतरिम स्थगिती दिलेली आहे. १९ जूनच्या निर्णयान्वये राज्य शासन तिन्ही बँकांना ३१९.५४ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करणार आहे. नागपूर बँकेला ९२.९४ कोटी, वर्धा बँकेला १०२.५६ कोटी, तर बुलडाणा बँकेला १२४.०४ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. परंतु, त्यासाठी विविध जाचक अटी ठेवण्यात आल्या आहेत.(प्रतिनिधी)
जिल्हा सहकारी बँकांवर ११ आॅगस्टला सुनावणी
By admin | Updated: August 1, 2014 01:10 IST