हेल्थ लायब्ररी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST2021-05-23T04:07:29+5:302021-05-23T04:07:29+5:30
ब्लॅक फंगस(म्युकरमायकोसिस)नंतर आता सगळीकडे व्हाईट फंगसची चर्चा सुरू झाली आहे. त्याला केंडिड फंगस संक्रमण म्हणूनही ओळखल्या जाते. कोरोनाच्या रुग्णांची ...

हेल्थ लायब्ररी
ब्लॅक फंगस(म्युकरमायकोसिस)नंतर आता सगळीकडे व्हाईट फंगसची चर्चा सुरू झाली आहे. त्याला केंडिड फंगस संक्रमण म्हणूनही ओळखल्या जाते. कोरोनाच्या रुग्णांची इम्युन सिस्टीम कमजोर होते. तर म्युकरमायकोसिस किंवा केंडिडायसस सारखे फंगल इन्फेक्शन त्याचे कारण ठरू शकतात. ब्लॅक आणि व्हाईट फंगसमधून अधिक धोकादायक काय आहे, याची माहिती जाणून घेऊ या.
- व्हाईट फंगसची लक्षणे?
सर्वसामान्य लक्षण म्हणजे जिभेवर किंवा टाळूवर फोड किंवा दही यासारखा पदार्थ. हे मधुमेहाच्या रुग्णांशिवाय स्टेरॉईड किंवा अस्थमासाठी स्टेरॉईडचे इन्हेलर घेणाऱ्या रुग्णात सर्वसामान्य आहे. हे ज्यांचा आजार नियंत्रणात नाही अशा एचआयव्ही/एड्सच्या रुग्णांमध्येही सामान्य आहे. व्हाईट फंगसमुळे जननेंद्रिय, त्वचा, श्वसनतंत्र किंवा गॅस्ट्रोइन्टेस्टिनल संक्रमण सामान्य आहे. यात गळा, तोंडातील फोडात जळजळ होऊ शकते. कोणतीही वस्तू गिळताना त्रास होऊ शकतो आणि डायरिया होऊ शकतो. महिलांच्या जननेंद्रियातून दह्यासारखा स्राव होऊ शकतो.
- व्हाईट फंगस आजाराची कारणे?
केंडिडायसस किंवा व्हाईट फंगस कमकुवत इम्युन सिस्टीमचे सर्वात मोठे प्रमाण आहे. हा फंगस गॅस्ट्रोइन्टेस्टिनल ट्रॅक्टशिवाय शरीराच्या काही इतर भागात असतो. हा झपाट्याने वाढतो आणि कमकुवत इम्युन सिस्टीममुळे त्याची लक्षणे दिसू लागतात. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णात हे बऱ्याच प्रमाणात आढळते. सर्वसामान्य लक्षणात टाळूमध्ये किंवा डायरियाच्या माध्यमातून दिसून येते. कोरोनाशिवाय व्हाईट फंगसमुळे काही रुग्णांना फुफ्फुसाच्या संक्रमणाचा सामना करावा लागणेही शक्य आहे. यामुळे त्यांना गंभीर आजार होतो. त्याची ओळख कठीण आहे. अनियंत्रित मधुमेहासोबत उच्च रक्तशर्करा, स्टेरॉईडचा दीर्घकाळ वापर आणि इम्युनोसप्रेस्ड व्यक्तींना अधिक धोका राहतो.
-कोरोना व्हायरससंदर्भात व्हाईट फंगसपासून कसा बचाव करावा?
स्टेरॉईडचा अंदाधुंद विनाकारण वापर टाळणे सर्वात महत्त्वाचे आहे. रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवा. योग्य वेळी इन्सुलीन महत्त्वपूर्ण आहे. तोंडाच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे. स्टेरॉईडचे इन्हेलर, नेबुलायझर किंवा रोटाहेलर्सच्या वापरानंतर तोंड चांगले स्वच्छ केले पाहिजे. क्लोरहेक्सिडीन असलेले माऊथवॉश बॅक्टेरियामुळे होणारे संक्रमण थांबविण्यात महत्त्वाचे असतात. जेल्स, क्रीम आणि टॅबलेटच्या माध्यमातून ओरल अँटी केंडिडायससचा उपचार सहज उपलब्ध आहे.
- ब्लॅक आणि व्हाईट फंगसपैकी अधिक घातक काय?
म्युकरमायकोसिसचा उपचार निश्चितपणे केंडिडायससच्या उपचारापेक्षा अधिक कठीण आहे. ब्लॅक फंगस आजार सायनस, ऑर्बिट, टाळू आणि मेंदूत अधिक होतो. ब्लॅक फंगस झपाट्याने पसरून हाडे आणि चेहऱ्याच्या टिश्यूजला आतून मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवितो. त्याची ओळख आणि उपचार कठीण आहे. व्हाईट फंगसची ओळख आणि उपचार तुलनात्मक रूपाने अधिक सोपी असते. परंतु फुफ्फुस, मेंदू, किडनी किंवा हार्ट व्हॉल्व्ह किंवा डोळ्यापर्यंत पसरल्यानंतर त्याचा उपचार कठीण होतो. त्वचा, नख, जननेंद्रिय किंवा तोंडापर्यंत मर्यादित राहिल्यास व्हाईट फंगसचा उपचार अधिक सोपा आहे.
- व्हाईट फंगसचा उपचार कसा करण्यात येतो?
कोरोना व्हायरस संक्रमणाच्या पृष्ठभूमीत तोंडाच्या फोडांसाठी तोंडावरच अँटी फंगस उपचार सोपा होतो. संक्रमण असल्यामुळे हा रक्ताच्या माध्यमातून संपूर्ण शरीरात झपाट्याने पसरतो. इंजेक्शनच्या माध्यमातून देण्यात येणारी अँटी फंगल औषधी उपलब्ध आहेत. औषधीचा वापर रुग्णाच्या स्थितीवर अवलंबून असतो.
- व्हाईट फंगसची पुष्टी कशी करण्यात येते?
अनेक रुग्णांमध्ये ही पुष्टी सामान्य क्लिनिकल तपासणीने माहीत होते. काही रुग्णांसाठी व्हाईट फंगस इन्फेक्शनसाठी उपलब्ध असलेल्या पॅथालॉजिकल टेस्टची मदत घ्यावी लागते.
- केंडिडाचे किती प्रकार आहेत?
केंडिडाचे २० पेक्षा अधिक प्रकार आहेत. केंडिडा अल्पकंस हा प्रकार सामान्य आहे. केंडिडाच्या काही प्रकारांचा परंपरागत पद्धतीने उपचार करणे शक्य होत नाही, हा चिंतेचा विषय आहे.
- केंडिडा ऑरिसबाबत काही खास बाबी?
केंडिडा ऑरिसची पहिली ओळख आशियात २००९ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर जगाच्या अनेक भागात त्याचा प्रसार झाला. जगाच्या काही भागात हे सर्व तीन अँटी फंगल अँटीबायोटिक्सच्या प्रतिरोधाची क्षमता प्राप्त केलेले आहे. हा रुग्णाच्या त्वचेवर विना संक्रमण उपलब्ध राहून दुसऱ्यापर्यंत पसरू शकतो.
............