मोठी मुलगी विकून ‘त्याला’ खरेदी करायचा होता मुलगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 20:41 IST2022-06-01T20:39:25+5:302022-06-01T20:41:40+5:30

Nagpur News दोन्ही मुलीच असल्यामुळे मोठी मुलगी विकून मुलगा विकत घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या पतीविरोधात संतप्त पत्नीने तक्रार नोंदविली आहे.

He wanted to sell the eldest daughter and wants to buy a 'boy' | मोठी मुलगी विकून ‘त्याला’ खरेदी करायचा होता मुलगा

मोठी मुलगी विकून ‘त्याला’ खरेदी करायचा होता मुलगा

ठळक मुद्देअनेक वर्षांपासून कुटुंबीयांचा सुरू होता छळसंतप्त पत्नीची पोलिसांत तक्रार

 

नागपूर : दोन्ही मुलीच असल्यामुळे मोठी मुलगी विकून मुलगा विकत घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या पतीविरोधात संतप्त पत्नीने तक्रार नोंदविली आहे. मागील अनेक वर्षांपासून संबंधित पती कुटुंबीयांचा छळ करत होता. तो असह्य झाल्यानंतर पत्नीने पोलिसांकडे धाव घेतली. अजनी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदविला आहे.

रमानगर परिसरात राहणाऱ्या सुनील शर्मा लग्नानंतर वर्षभरातच पत्नीला छळायला लागला होता. दारूच्या नशेत तो वारंवार पत्नीला मारहाण करायचा. पहिली मुलगी झाल्यावरदेखील हा प्रकार सुरू होता. दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या काही आठवडे अगोदर त्याने पत्नीवर काठीने हल्ला केला होता व त्यात ती जखमी झाली होती. मुली मोठ्या होत असतानादेखील सुनीलकडून छळ सुरूच होता. सहा महिन्यांअगोदर त्याने पत्नीच्या डोक्यावर काच फोडली होती. तो पत्नीवर लैंगिक अत्याचारदेखील करत होता. शिवाय तिला गर्भधारणा झाल्यावर तो जबरदस्तीने औषध प्यायला द्यायचा व त्यामुळे तिचा काही वेळा गर्भपातदेखील झाला.

५० हजारांत करणार होता मुलाची खरेदी

मागील महिन्यात त्याने अज्ञात व्यक्तीशी फोनवर संपर्क केला. मोठ्या मुलीला विकण्याची व ५० हजार रुपयात मुलगा विकत घेण्याची संबंधित व्यक्तीशी चर्चा केली. पत्नीने यावर जाब विचारला असता परत त्याने तिला मारहाण केली. या प्रकारामुळे दहशतीत आलेल्या पत्नीने अखेर अजनी पोलीस स्थानकात धाव घेतली व तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कुणाशी मुलीची विक्री व मुलाच्या खरेदीबाबत चर्चा केली याचा तपास सुरू आहे.

...

Web Title: He wanted to sell the eldest daughter and wants to buy a 'boy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.