खिशातून पैसे काढल्याच्या रागापायी झोपलेल्या पत्नीच्या गळ्यावर केला ब्लेडने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 21:50 IST2021-10-07T21:49:44+5:302021-10-07T21:50:14+5:30
Nagpur News झोपेत असलेल्या पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याची घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ९.३० वाजता घडली.

खिशातून पैसे काढल्याच्या रागापायी झोपलेल्या पत्नीच्या गळ्यावर केला ब्लेडने वार
नागपूर : झोपेत असलेल्या पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याची घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ९.३० वाजता घडली. नबीना शंकर आडे (२५, रा. प्लॉट नं. २४८, गल्ली नं. १५, मिनीमातानगर) असे जखमी महिलेचे नाव आहे. तिचा पती शंकर यशवंत आडे (३०) याने बुधवारी सकाळी आपल्या खिशातून पैसे का काढले म्हणून पत्नीसोबत वाद घातला. त्यानंतर रात्रीच्या वेळी पत्नी झोपी गेल्यानंतर त्याने आपल्या जवळील ब्लेडने गळ्यावर वार करून तिला जखमी केले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास उपनिरीक्षक अनिता खोब्रागडे करीत आहेत.