शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर डोक्यात घालून पत्नीची हत्या अन् रात्र काढली मृतदेहाशेजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 11:28 IST

घरगुती वादातून पतीच्या अंगात शिरला सैतान

नागपूर : घरगुती वादातून एका पतीच्या अंगात अक्षरश: सैतान शिरला आणि त्याने आपल्या पत्नीवर अगोदर सिलिंडरने प्रहार करून व नंतर तिचा गळा दाबून तिची हत्या केली. मात्र त्याला या गोष्टीचा तेव्हा कुठलाही पश्चाताप झाला नाही. तो रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारी झोपला व त्याने काही वेळ मोबाइलदेखील बघितला. सकाळी तो पोलिस ठाण्यात पोहोचला. हा प्रकार ऐकून पोलिसदेखील अचंबित झाले. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही भयंकर घटना घडली.

अबरजरीन नय्यर समीर अन्सारी (३५) असे मृत पत्नीचे नाव असून समीर मोहम्मद हनिफ अन्सारी (४९) हा आरोपी पती आहे. दोघांनीही काही कालावधी अगोदर हुडकेश्वरच्या बहादुरा येथील घोडनी सिममध्ये टेक ऑफ गार्डन स्कीममधील ई-विंगमध्ये फ्लॅॅट घेतला होता. दोघांचेही सात वर्षांअगोदर लग्न झाले होते. मात्र त्यांना मूलबाळ नव्हते. पती लैंगिक समस्येने ग्रस्त होता व त्यामुळे त्यांना मूल होत नव्हते. त्यांच्यात काही वर्षांपासून लहानसहान गोष्टींवरून वाद होत होते.

सोमवारी रात्री दोन ते तीन वाजताच्या दरम्यान कपडे न आणल्याच्या कारणावरून त्यांचा परत वाद झाला. पत्नीने त्याला अपमानास्पद शब्द बोलले व यामुळे समीर संतापला. पत्नी झोपली असताना त्याने स्वयंपाकघरातून भरलेले गॅस सिलिंडर आणले व तिच्या डोक्यातच घातले. त्याने पाच ते सहा वेळा सिलिंडरने प्रहार केला. अगोदर त्याला तिचा मृत्यू झाल्याचे वाटले. मात्र हालचाल होत असल्याने त्याने तिचा गळा दाबून जीव घेतला. यानंतर हातपाय धुऊन त्याने हाती मोबाइल घेतला व तासभर रिल्स पाहत बसला. त्यानंतर तो झोपी गेला.

सकाळी उठून तो वाठोडा पोलिस ठाण्यात गेला व त्याने पत्नीची हत्या केल्याची माहिती दिली. वाठोडा पोलिस ठाण्यातून याची माहिती हुडकेश्वर पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक नरेश पंडित यांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला व त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर