शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना पाहून टाळ्या वाजविणे ‘त्याला’ महागात पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:24 IST

तोंडावर मास्क न घालता आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन न करता मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलांना पाहून टाळ्या वाजविणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोंडावर मास्क न घालता आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन न करता मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलांना पाहून टाळ्या वाजविणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. त्या व्यक्तीविरुद्ध मानकापूर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यासंबंधाने आरोप-प्रत्यारोप तसेच उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.प्रकरण मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर परिसरातील आहे. परिसरातील रहिवासी महिला सोमवारी सकाळी फिरायला निघाल्या. आपल्या घराच्या गॅलरीत उभा असलेल्या एका व्यक्तीने त्यांना पाहून टाळ्या वाजविल्या. शहरात कोरोनाचा प्रकोप सारखा वाढत आहे. तुम्ही तोंडावर मास्क बांधलेला नाही आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’चेही पालन करीत नाही, हा प्रकार योग्य नाही, असे म्हणत या व्यक्तीने टाळ्या वाजविल्या. मात्र त्याची ही गांधीगिरी त्याच्यावर उलटली. महिलांनी त्याला खडेबोल सुनावले. त्यावरून बाचाबाची झाली. महिलेने आपल्या पतीला माहिती देऊन बोलावून घेतले. महिलेचा पती पोलीस विभागात कार्यरत आहे. तो तडक पोहोचला आणि टाळ्या वाजविणाऱ्या व्यक्तीशी त्याने जोरदार वाद घातला. त्यानंतर महिलेने संबंधित व्यक्तीविरुद्ध मानकापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ज्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला ते वकील असून, आपण गांधीगिरीच्या रूपाने टाळ्या वाजविल्या, असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाच्या संबंधाने परिसरात उलटसुलट चर्चा असून दोन परिवारातील हा जुना वाद आहे तो आता या वळणावर आल्याचीही चर्चा आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस