लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका धावत्या ट्रकच्या चाकात एका व्यक्तीने स्वत:ला झोकून देत जीव दिला. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजता सदर येथील गड्डीगोदाम चौकात घडली. मृत व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही.बुधवारी दुपारी डी.एल. /१/जी.सी./५०९८ या क्रमांकाचा ट्रक कामठी रोडकडून एलआयसी चौकाच्या दिशेने जात होता. गड्डीगोदाम चौकात लोकांची वर्दळ असल्याने आणि मेट्रोचे काम सुरु असल्याने ट्रकची गती अतिशय कमी होती. त्याचवेळी ४०-४५ वर्षाची एक व्यक्ती ट्रकच्या मध्ये घुसली आणि मागच्या चाकात जाऊन झोपला. यात त्याचाचा जागेवरच मृत्यू झाला. हे सर्व इतके अचानक घडले कुणाला काहीच समजले नाही. ट्रकमध्ये मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात येणारी मिनी क्रेन ठेवली होती. ट्रक पुढे निघून गेला. घटनेची माहिती होताच सदर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. ते ट्रकचा शोध घेऊ लागले. ट्रक चालकच्या निष्काळजीमुळेच अपघात झाल्याचे सर्वांना वाटत होते. पोलिसांनी गड्डीगोदाम चौकातील सीसीटीव्ही फुटेज मिळविले. ते पाहिल्यावर खरा प्रकार लक्षात आला तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. मृताची ओळख पटू शकली नाही. त्याच्या हातात ब्रेसलेट आहे. त्यात पंकजा असे लिहिलेले आहे. छातीवर उजव्या बाजूला इंग्रजीत ‘एन’ आणि डाव्या बाजूला ‘नीत’ असे गोंदलेले आहे. त्याने कथ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. सदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु केला आहे.
त्याने धावत्या ट्रकमध्ये स्वत:ला दिले झोकून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 23:53 IST
एका धावत्या ट्रकच्या चाकात एका व्यक्तीने स्वत:ला झोकून देत जीव दिला. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजता सदर येथील गड्डीगोदाम चौकात घडली. मृत व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही.
त्याने धावत्या ट्रकमध्ये स्वत:ला दिले झोकून
ठळक मुद्देमृताची ओळख पटली नाही : सीसीटीव्हीमुळे खुलासा