शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

‘एचसीएल’ एक हजार फ्रेशर्स व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

- मिहानमध्ये ५० एकरात कॅम्पस : एचसीएलची विविध मोहीम नागपूर : आघाडीची जागतिक तंत्रज्ञान कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे उपाध्यक्ष ...

- मिहानमध्ये ५० एकरात कॅम्पस : एचसीएलची विविध मोहीम

नागपूर : आघाडीची जागतिक तंत्रज्ञान कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे उपाध्यक्ष (कॉर्पोरेट) शिवाशंकर यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत मिहान नागपूर येथील एचसीएल कॅम्पसमध्ये येणाऱ्या महिन्यात एक हजार फ्रेशर्स आणि अनुभवी प्रोफेशनल्सला रोजगाराची संधी देण्याची घोषणा केली. कॉलेज फ्रेशर्स, कार्यरत प्रोफेशनल्ससाठी सर्वोत्तम कौशल्ये आणि अनुभवासह या रोजगारासाठी अर्ज करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

मिहानमध्ये एचसीएलचा ५० एकरचा कॅम्पस एप्रिल २०१८पासून दोन हजार कर्मचाऱ्यांसह कार्यरत आहे. हे केंद्र आता अमेरिकेच्या ग्रीन बिल्डिंग कौन्सिलद्वारे जगभरातील प्लॅटिनम प्रमाणित कॅम्पसच्या एलिट लीगचा भाग आहे. एचसीएलचे नागपूर येथील केंद्र आता अत्याधुनिक ग्लोबल आयटी डेव्हलपमेंट सेंटर बनविणे, भरती करणे, प्रशिक्षण देणे, स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्यासाठी शाश्वत इको-सिस्टम तयार व ऑपरेट करणे या एचसीएलच्या तत्त्वज्ञानासारखे आहे. एचसीएल नागपूर अभियांत्रिकी, अनुसंधान व विकास सेवा (ईआरएस), अनुप्रयोग विकास आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापन सेवा व्यवसायावर लक्ष केंद्रित करते.

एचसीएल नागपूरची ‘कम बॅक होम’ ही मोहीम नागपुरातील प्रतिभावान लोकांपर्यंत पोहोचत त्यांना त्यांच्या घरी परत बोलावून ईआरएस, ॲप्लिकेशन आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापन सेवेमध्ये करिअर बनविण्यासाठी प्रोत्साहित करते. तसेच ‘स्टे रुटेड’ ही मोहीम पदवीधरांसाठी त्यांच्या स्वत:च्या शहरात जागतिक पातळीवर संधी निर्माण करण्यावर केंद्रित असून, नवीन संधींसह नवीन लोकांपर्यंतदेखील पोहोचते.

अनुभवी व्यावसायिक जावा, नेट, सेल्सफोर्स, म्यूलसॉफ्ट, पीएलएम, ऑटोमेशन टेस्टिंग, एंड-यूजर कॉम्प्युटिंग, डेटा सेंटर ऑपरेशन्स, सर्व्हिस डिलिव्हरी मॅनेजर, ऑपरेशन्स मॅनेजर, प्रोजेक्ट आणि प्रोग्राम मॅनेजर यासारख्या लीडरशिप रोलसह मुख्य तंत्रज्ञानामध्ये दोन ते २० वर्षांच्या अनुभवासह एचसीएलमध्ये सामील होऊ शकतात. एचसीएलचा ‘न्यू विस्टास’ पुढाकार भारतात नावीन्यपूर्ण संधी आणि प्लॅटफॉर्म्ससह प्रतिभा प्रदान करीत आहे. मागील चार वर्षांपासून मदुराई, लखनऊ, नागपूर आणि विजयवाडा यासारख्या शहरातील ‘न्यू विस्टास’मधील केंद्रांचा विकास झाला असून, तिथे १५ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांना नियुक्त करण्यात आले आहे. (वा.प्र.)