शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवली, फडणवीसांना कोर्टाची नव्याने नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 16:03 IST

नागपूर खंडपीठाने सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस व स्टेट बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देसरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सेस बँकेत वळवली

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) व स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank of India) नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची बँक खाती अॅक्सिस बँकेत (Axis Bank) वळवल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून चार आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

सुनील शुक्रे आणि अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने ही नोटीस बजावली. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत नोकरीला आहेत. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करुन सरकारी कर्मचाऱ्यांचे खाते इतर बँकांमधून अॅक्सिस बँकेत वळवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. 

मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी त्यांच्या आदेशानुसार राज्याच्या मुख्य सचिवांनी परिपत्रक काढून सरकारी कर्मचाऱ्यांची एसबीआय व इतर राष्ट्रीयीकृत बँकांमधील खाती अॅक्सिस बँकेत वळती करण्याचा आदेश दिला होता, असा आरोप करणारी जनहित याचिका मोहनीश जबलापुरे यांनी हायकोर्टात दाखल केली होती. या प्रकरणी त्यांना आधीही नोटीस बजावण्यात आली होती पण, तोपर्यंत त्यांचा राहण्याचा पत्ता बदलला. याप्रकरणी बुधवारी त्यांना नव्याने नोटीस बजावण्यात आली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसHigh Courtउच्च न्यायालयCourtन्यायालयSBIएसबीआयPoliticsराजकारणbankबँकAmruta Fadnavisअमृता फडणवीस