प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान सुविधा तयार ठेवा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:07 IST2021-05-24T04:07:32+5:302021-05-24T04:07:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ग्रामीण भागात कोरोना चाचणी व लसीकरणावर भर देण्यात यावा, तसेच लोकांच्या मनात लसीकरणाबाबत ...

प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान सुविधा तयार ठेवा ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण भागात कोरोना चाचणी व लसीकरणावर भर देण्यात यावा, तसेच लोकांच्या मनात लसीकरणाबाबत असलेला संभ्रम दूर करावा. तसेच लहान मुलांवर उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांत किमान सुविधा तयार ठेवा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राऊत यांनी रविवारी नागपूर जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी या तालुक्यांचा दौरा केला. यावेळी तेथील आरोग्य सुविधा व लसीकरणाच्या स्थितीची माहिती जाणून घेतली. कन्हान, देवलापार व पारशिवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या.
कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची माहिती घेतली त्याचप्रमाणे कोरोना बाधित किती लोक आहेत व लसीकरण किती लोकांचे झाले, याचीही माहिती घेतली. रामटेक तालुक्यातील देवलापार या आदिवासीबहुल गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला सुद्धा पालकमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी तेथील नागरिकांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी पालकमंत्र्यांनी डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तिसऱ्या लाटेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोणत्या सुविधा आहेत. याची माहिती जाणून घेतली.
या दौऱ्यात पालकमंत्र्यांसोबत आमदार आशिष जयस्वाल, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर, माजी राज्यमंत्री व नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस समितीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, काँग्रेस नेते गज्जू यादव, राजा करवाडे, अनिल करवाडे, मुजीब पठाण, राजा तिडके व साजा सेठ आदी उपस्थित होते.