नागपूरच्या हर्षल बजाज ठरल्या मिस इंटरनॅशनल टायटॅनिक युनिव्हर्सल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2022 20:49 IST2022-09-23T20:49:04+5:302022-09-23T20:49:47+5:30
Nagpur News गोवा कार्निव्हलमध्ये संपन्न झालेल्या ब्युटी पेजन्टमध्ये हर्षल बजाज यांनी ऑनलाईनच्या ६४ प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून मिस इंटरनॅशनल टायटॅनिक युनिव्हर्सल ब्युटीचा पुरस्कार पटकावला.

नागपूरच्या हर्षल बजाज ठरल्या मिस इंटरनॅशनल टायटॅनिक युनिव्हर्सल
नागपूर : इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ पीपल, जन परिषद आणि जेएमव्हीव्ही एसएसच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोवा कार्निव्हलमध्ये संपन्न झालेल्या ब्युटी पेजन्टमध्ये हर्षल बजाज यांनी ऑनलाईनच्या ६४ प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून मिस इंटरनॅशनल टायटॅनिक युनिव्हर्सल ब्युटीचा पुरस्कार पटकावला.
हर्षल बजाज यांनी यापूर्वी मिस टायटॅनिक इंडियन ब्युटीचा पुरस्कार मिळविला होता. गोवा कार्निव्हलच्या पहिल्यादिवशी पर्यावरणावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी जन परिषदेचे अध्यक्ष एन. के. त्रिपाठी होते. व्यासपीठावर मिसेस युनिव्हर्सल श्रुती पटोले यांच्यासह जितेंद्र कपूर, डॉ. प्रमोद पाटील, ओ. पी. गुप्ता, प्रो. अरुण सिंह उपस्थित होते. बेस्ट पेपर प्रेझेंटेशनचा अवॉर्ड अनुष्का नायक, रीना कुमारी यांना प्रदान करण्यात आला. अखेरच्यादिवशी परीक्षक आय. एस. श्रीवास्तव, भाजपचे वरिष्ठ नेते राज शर्मा, गजेंद्र पुरोहित, एन. के. त्रिपाठी यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
मिस युनिव्हर्स श्रुती पटोले आणि गोव्याच्या नामवंत फॅशन डिझायनर रितू पुरी यांनी हर्षल बजाज आणि इतर विजेत्यांना क्राऊन सेस सर्टिफिकेट आणि पदक देऊन सन्मानित केले. स्नेहा उगरेंट, दिव्या शिरोडकर, रोहिणी, डिंपल शाह आणि संतोष कबलकर मिस टायटॅनिक इंडियन ब्युटीच्या वेगवेगळ्या श्रेणीत उपविजेत्या ठरल्या. आरती मेहता यांनी मिसेज टायटॅनिक इंडियन ब्युटीचा पुरस्कार जिंकला. मिस इंटरनॅशनल ठरणाऱ्या हर्षल बजाज शहरातील सुप्रसिद्ध डॉ. सुभाष आणि राणी बजाज यांच्या सुपुत्री होत.
...........