हॅप्पी न्यू इयर, नो व्हिस्की-बीअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 21:52 IST2019-12-31T21:51:30+5:302019-12-31T21:52:23+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूरच्या कोराडी शाखेने ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या उपक्रमांतर्गत ‘हॅप्पी न्यू इयर, नो व्हिस्की-बीअर’ अशी गर्जना करत जनजागृृती केली.

हॅप्पी न्यू इयर, नो व्हिस्की-बीअर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूरच्या कोराडी शाखेने ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या उपक्रमांतर्गत ‘हॅप्पी न्यू इयर, नो व्हिस्की-बीअर’ अशी गर्जना करत जनजागृृती केली.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष असतानाही, काही व्यसनाधिन माणसे दारू पिऊन धिंगाणा घालतात आणि बरेचदा अपघातात मृत्युमुखी पडतात. शिवाय, सामान्यांनाही अपघाताला कारणीभूत होतात. त्यासंदर्भात जनजागृतीच्या हेतूने हे अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी व्यसन न करण्याची प्रतिज्ञा घेतली. तसेच प्रतिज्ञेवर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत श्रीखंडे, जिल्हा प्रधान सचिव गौरव आळणे, जिल्हा वैज्ञानिक जाणिवा कार्यवाहक बबन द्रवेकर, शाखा कार्याध्यक्ष बी. एन. गायकवाड, शाखा प्रधान सचिव विलास भालेराव, शाखा माजी अध्यक्ष रामेश्वर चौरे, सामाजिक कार्यकर्ते सी. सी. वासे, शेषराव हावरे, भगवान सोनवणे, संगीता आळणे, गीता सरजारे, मीरा धुर्वे, उमा परीपगार, कमलेश्वरी सोनवानी, हेमलता हिरवानी, अर्चना नेताम, गरिमा लोहासारवा, रामदास दिपके, प्रसन्न चंद्रमोरे उपस्थित होते. प्रास्ताविक गौरव आळणे यांनी केले तर आभार विलास भालेराव यांनी मानले.