सखींनी लुटला मान्सून सहलीचा आनंद
By Admin | Updated: August 6, 2014 01:15 IST2014-08-06T01:15:11+5:302014-08-06T01:15:11+5:30
लोकमत सखी मंच शाखा काटोलच्यावतीने मान्सून सहलीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. कोंढाळीनजीकच्या बाजारगाव येथील फन अॅण्ड फूड व्हीलेज येथे काटोलच्या सखींनी

सखींनी लुटला मान्सून सहलीचा आनंद
फन अॅण्ड फूडमध्ये रमल्या काटोलच्या सखी
नागपूर : लोकमत सखी मंच शाखा काटोलच्यावतीने मान्सून सहलीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. कोंढाळीनजीकच्या बाजारगाव येथील फन अॅण्ड फूड व्हीलेज येथे काटोलच्या सखींनी सहलीचा मनमुराद आनंद लुटला.
सहलीमध्ये वॉटरपार्क, रेन डान्स, बोटिंग, ईगल राईड, ड्रॅगन, रोल अॅण्ड रोल, स्लाईड शो, बफेट बुट तसेच विविध झुल्यांचा सखींनी आनंद घेतला. या मान्सून सहलीमध्ये २४ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांचा उत्साह पाहण्याजोगा होता. सोबतच धंतोली गु्रपतर्फे गेमचे आयोजन केले होते. कंट्री टू कंट्री या गेममध्ये प्रथम बक्षीस पद्मा परमार द्वितीय मालू बरडे यांनी पटकावले. संगीत खुर्ची स्पर्धेत कविता वांदे प्रथम तर सोनाली घोडे द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. प्रोत्साहनपर वंदना थोटे,अर्पणा राऊत यांना प्रदान करण्यात आले.
या सहलीच्या आयोजनासाठी काटोल सखी मंच संयोजिका राधा घोडे, जया देशमुख, पूजा देशमुख, छाया मुसळे, मंगला गोतमारे, स्नेहल खळतकर, अनुराधा खराडे, संध्या डोंगरवार, संगीता सांबारतोडे, गौरी खराडे, सुषमा तायडे, वैशाली अंजनकर, कीर्ती माने, भाग्यश्री येवले, ज्योती पवार, मीना भोयर, ममता परमाल, मीना चव्हाण, हेमा खोरगडे, सविता देशमुख, माया रिधोरकर, शुभांगी खरबडे, उर्मिला चरडे, स्मिता तिजारे सुचिता खरबडे, मीनल चोपडे, हेमलता चोबीटकर, पल्लवी मानकर, विजया गोतमारे, भावना ठाकरे, सरला ठाकरे, प्रणाली सुपटे, गायत्री डांगोरे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)