शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या

By admin | Updated: July 21, 2016 02:03 IST

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांना फाशी देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ...

अंनिसचे आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन नागपूर : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांना फाशी देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारी संघटनांनी संविधान चौकात नारे-निदर्शने आंदोलन केले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी या पुरोगामी विचारवंतांचा खून करणाऱ्या मारेकऱ्यांची रेखाचित्रे राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात तसेच महत्त्वाच्या ठिकाणी लावावी, सारंग अकोलकर, प्रवीण निंबकर, रुद्र पाटील, जयप्रकाश हेगडे या एएनआयला हव्या असलेल्या सनातन संस्थेच्या फरार साधकांचे एएनआयच्या वेबसाईटवर असलेले फोटो राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात लावावी, भाजपातील कार्यकर्ते सनातन संस्था, हिंदू जनजागरण समिती या संघटनांना पाठिंबा देतात त्यांना समज द्यावी, सनातनवरील बंदीविषयी राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने भूमिका जाहीर करावी, आदी मागण्या आंदोलनादरम्यान रेटून धरण्यात आल्या. आम्ही सारे पानसरे, दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे, हिंसेला नकार मानवतेचा स्वीकार आदी घोषणा आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी दिल्या. आंदोलनानंतर अंनिसचे जिल्हाध्यक्ष संजय शेंडे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर धंदरे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पखिड्डे, प्रधान सचिव विनोद उलीपवार, अग्रगामी किसान सभेचे अरुण वनकर, सीपीआयचे हरेन श्रीवास्तव, मुस्लीम महिला मंचाच्या लीना बागडे, निखत शेख, प्रयास सोशल फाऊंडेशनचे प्रवीण मानवटकर, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे विलास भोंगाडे, आम आदमी पार्टीचे जगजितसिंग, नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियनचे जम्मु आनंद, शिक्षण संघर्ष समितीचे विजय बाभुळकर, भारतीय बौद्ध महासभेचे सुरेश पाटील आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)