वेगळ्या विदर्भासाठी केले अर्धनग्न आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 15:03 IST2021-08-12T15:02:17+5:302021-08-12T15:03:35+5:30
Nagpur News क्रांतीदिनाच्या पर्वावर विदर्भ आंदोलन समितीतर्फे गुरुवारी सकाळी विदर्भ चंडिका मंदिरात आंदोलन करण्यात आले.

वेगळ्या विदर्भासाठी केले अर्धनग्न आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: क्रांतीदिनाच्या पर्वावर विदर्भ आंदोलन समितीतर्फे गुरुवारी सकाळी विदर्भ चंडिका मंदिरात आंदोलन करण्यात आले. समितीच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न राहून वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी आंदोलकांंना ताब्यात घेतले असून, आंदोलनस्थळावरील बॅनर्सही काढून टाकले आहेत.
गुरुवारी सकाळी विदर्भ चंडिका मंदिरात पोलिसांचा मोठा ताफा सज्ज होता. आंदोलनकर्त्यांनी शर्ट बनियन काढून आंदोलन सुरू करताच, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांना विरोध करताना आंदोलनकर्ते रस्त्यावर आडवे झोपले. त्यांना तेथूनही पोलिसांनी ओढून नेले. घटनास्थळी कार्यकर्ते व पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते.