मृगबहारातील निम्मे शेतकरी पंतप्रधान फळ पीक विमा योजनेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:21 IST2020-11-26T04:21:05+5:302020-11-26T04:21:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पंतप्रधान शेतकरी फळ पीक विमा योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. ...

मृगबहारातील निम्मे शेतकरी पंतप्रधान फळ पीक विमा योजनेपासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान शेतकरी फळ पीक विमा योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. आंबेबहारातील सर्वच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. परंतु मृगबहारात ३,५२२ शेतकऱ्यांपैकी फक्त १,१०४ शेतकरी पात्र ठरले असून त्यांना १ कोटी १० लाख ७४ हजार ४० रुपयांचा लाभ मिळाला आहे. बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा जमा झाल्या आहेत.
आंबेबहारात बहुतेक फळपीक संत्र्याचे होते. नागपूर जिल्ह्यात १,७५३ गावांमधील १,७५३ शेतकऱ्यांनी यासाठी विमा उतरविला होता. या सर्वच शेतकऱ्यांचे दावे पात्र ठरले. त्यामुळे त्या सर्वांना रक्कम मिळाली असून खात्यावर पैसाही जमा झाला आहे. या अंतर्गत एकूण ७ कोटी ५९ लाख ८२ हजार ५१ रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. नरखेड खालोखाल काटोल तालुक्यतील शेतकऱ्यांना याचा चांगला लाभ झाला आहे.
मृगबहारासाठी एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीने ही योजना राबविली होती. यात संत्री आणि मोसंबी या फळपिकांचा अंतर्भाव आहे. यात ५६ गावांमधील ३५२२ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. त्यापैकी फक्त ११०४ शेतकरी पात्र ठरले. त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत आहे.
या योजनेत भिवापूर, हिंगणा, कळमेश्वर, कुही, नागपूर ग्रामीण, पारशिवनी, सावनेर या तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र लाभ मिळालेला नाही.
...
कोट
आंबेबहार आणि मृगबहार या दोन्ही प्रकारच्या फळपीक योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा जमा होत आहे. आंबेबहार फळपिकामध्ये सर्वच शेतकरी पात्र ठरले आहेत.
- मिलिंद शेंडे, जिल्हा कृषी अधीक्षक, नागपूर
...
आंबेबहारातील पात्र शेतकरी
तालुका शेतकरी दावे गाव
हिंगणा ११ ११ ३
कळमेश्वर ९५ ९५ ४
काटोल ३४३ ३४३ ५
कुही १ १ १
नागपूर ग्रामीण ५ ५ ३
नरखेड १२१२ १२१२ ६
कामठी १ १ १
पारशिवनी ५ ५ ३
रामटेक २ २ २
सावनेर ७८ ७८ ५
एकूण १७५३ १७५३ ३३
(सर्व संत्री फळपीक)
............
मृगबहारातील पात्र शेतकरी
फळ तालुका शेतकरी दावे गावे
संत्री भिवापूर ५ - १
संत्री हिंगणा ५६ - ५
मोसंबी कळमेश्वर ६ - ३
संत्री कळमेश्वर ४६५ - ४
मोसंबी काटोल २५१ - ६
संत्री काटोल ६३४ ७६ ६
संत्री कुही २ - १
संत्री नागपूर ग्रामीण ९ - ३
मोसंबी नरखेड ३०३ ५२५ ६
संत्री नरखेड १६७० ५०२ ६
संत्री पारशिवनी ५ - ५
संत्री रामटेक ३ १ २
मोसंबी सावनेर ७ - ३
संत्री सावनेर ११५ - ५
एकूण ३५२२ ११०४ ५६