हज यात्रेकरूंना घ्यावी लागेल काेराेनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST2021-04-16T04:08:27+5:302021-04-16T04:08:27+5:30
नागपूर : हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांना आता काेराेनाच्या दाेन्ही लसी घेणे बंधनकारक असेल. हज कमिटी ऑफ इंडियाने गुरुवारी याबाबतचे ...

हज यात्रेकरूंना घ्यावी लागेल काेराेनाची लस
नागपूर : हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांना आता काेराेनाच्या दाेन्ही लसी घेणे बंधनकारक असेल. हज कमिटी ऑफ इंडियाने गुरुवारी याबाबतचे परिपत्रक अधिकारिक रूपाने जारी केले. हज कमिटीने सांगितले, हज यात्रेबाबत सऊदी सरकारने अद्याप काहीच स्पष्ट केले नसून हा निर्णय पूर्णपणे सऊदी सरकारवर अवलंबून असेल. मात्र, यात्रेची परवानगी मिळालीच तर यात्रा शक्यताे जून महिन्यात सुरू हाेईल. अशावेळी निवड झालेल्या हज यात्रेकरूंना सऊदी अरबला रवाना हाेण्यापूर्वी काेराेनाचे दाेन्ही डाेस घेणे गरजेचे असेल.
हज कमिटी ऑफ इंडियाने आवेदनकर्त्यांना आपल्या स्तरावर काेराेनाची पहिली लस घेण्याची सूचना केली, जेणेकरून दुसरी लस वेळेवर घेता येईल. यामुळे ते वेळेवर तयार राहतील आणि लसीच्या कारणाने यात्रेत खाेडा येणार नाही. उल्लेखनीय म्हणजे काेराेना संक्रमणाच्या वाढत्या प्रकाेपामुळे सऊदी सरकारने हज यात्रेकरूंना पाठविण्याबाबत स्पष्ट केलेले नाही. याच कारणाने हज कमिटीने आवेदनकर्त्यांची निवड प्रक्रिया थांबविली आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हज यात्रेची आवेदन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भातून माेठ्या संख्येने आवेदन करण्यात आले आहे. नागपूरवरूनच संपूर्ण विदर्भ, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी रवाना हाेत असतात.