शहरं
Join us  
Trending Stories
1
मोस्ट वॉन्टेड अनमोल बिश्नोईला भारतात आणले जाणार; पण पुढे काय कारवाई होणार?
2
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
5
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
6
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
7
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
8
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
9
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
10
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
11
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
13
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
14
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
15
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
16
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
17
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
18
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
19
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गारपीट, बहुतेक भागात वावटळ; आठवडाभर अवकाळीचा अंदाज

By निशांत वानखेडे | Updated: May 3, 2025 20:30 IST

पावसाळी स्थिती असतानाही तापमान २ अंशाने वधारले, मात्र आकाशात सर्वत्र पसरलेल्या ढगांच्या सावलीने नागपूरकरांना उन्हाचे चटके बसू दिले नाही.

नागपूर : हवामान विभागाने वर्तविलेला अवकाळी पावसाचा अंदाज नागपूरकरांसाठी सहा दिवसानंतर खरा ठरला. शनिवारी शहरातील काही भागात गारपीट व वादळासह जाेरदार पावसाने हजेरी लावली. इतर भागात पाऊस नव्हता पण वादळी वारे वाहत राहिले. पावसाळी स्थिती असतानाही तापमान २ अंशाने वधारले, मात्र आकाशात सर्वत्र पसरलेल्या ढगांच्या सावलीने नागपूरकरांना उन्हाचे चटके बसू दिले नाही.एप्रिलच्या २७ तारखेपासूनच विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला हाेता. गडचिराेली व गाेंदिया जिल्ह्यात त्यानुसार ढगांनी बरसात केली. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरीमध्येही पावसाने हजेरी लावली. यातून नागपूर व इतर शहरे मात्र सुटली. नागपुरला चार-पाच दिवसांपासून उन-सावलीचा खेळ सुरू आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण तयार हाेते पण दिवसभर नागरिकांना तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. तापमान ४० ते ४२ अंशादरम्यान नाेंदविले जात आहे. शनिवारीही यात २.२ अंशाची वाढ हाेत पारा ४१.६ अंशावर पाेहचला.तापमान वाढले खरे पण त्याचा त्रास नागरिकांना झाला नाही. सकाळपासून जाणवलेले साैर चटके दुपारी कमी झाले. दुपारी अचानक सर्व आकाश ढगांनी व्यापून घेतले आणि वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. काही भागात व विशेषत: पूर्व नागपूरच्या वस्त्यांमध्ये वादळासह जाेरदार पाऊस बरसला. किमान तासभर चाललेल्या या पावसादरम्यान गारांचीही बरसात झाली. वादळी पावसाने पूर्वच्या वस्त्यांमध्ये झाडे काेसळली व वीजेची तारे तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला हाेता. अचानक आलेल्या वादळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.नागपूरसह गाेंदिया व ब्रम्हपुरीतही जाेरदार पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे चंद्रपूरला मात्र आजही उन्हाचे चटके बसले. येथील पारा वाढून ४३.४ अंशावर गेला. पश्चिम विदर्भातील शहरांचा ताप कायम राहिला. अकाेल्यात शनिवारीही ४४.३ अंश तापमानाची नाेंद झाली, जी राज्यात सर्वाधिक आहे. यवतमाळ, वाशिमचा पारासुद्धा ४३ अंशाच्या पार गेला.हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक भागात येत्या १० मे पर्यंत अवकाळी पावसाची स्थिती राहणार आहे. त्यानुसार तापमानात एक-दाेन अंशाची वाढही हाेण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर