शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

संत साहित्याचे अभ्यासक, ज्ञानसाधू वासुदेव चोरघडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 10:51 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संत साहित्याचे अभ्यासक, प्रवचनकार आणि ज्योतिषाचार्य म्हणून ओळख असलेले ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे यांचे रविवारी ...

ठळक मुद्देनाट्यकलावंत, प्रवचनकार, ज्योतिषाचार्य अशी ओळख

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत साहित्याचे अभ्यासक, प्रवचनकार आणि ज्योतिषाचार्य म्हणून ओळख असलेले ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे यांचे रविवारी पहाटे निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी वसुधा, मुलगा अभय, दोन मुली जयश्री व अपर्णा, जावई, स्नुषा अंजली व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.अभ्यंकरनगर रहिवासी असलेले वासुदेव चोरघडे यांनी डीएजीपीटी येथून लेखाधिकारी म्हणून ३० वर्षे सेवा दिली होती. आकडेमोड करणाऱ्या वासुदेव यांना सुरुवातीपासूनच धर्म, अध्यात्माची गोडी होती.श्री वासुदेवानंद सरस्वती यांना दैवत मानणाºया चोरघडे यांनी वेदशास्त्रसंपन्न अंबादासशास्त्री पांडे यांच्या मार्गदर्शनात संत साहित्याचा भरीव अभ्यास केला. पुढे निवृत्तीनंतर त्यांनी ज्ञानसाधना, समाजसाधना व धर्मसाधनेत स्वत:ला वाहून घेतले. रामायण, समर्थप्रणित आत्माराम, दासबोध, ज्ञानेश्वरी, नारदाची भक्तिसूत्रे, विष्णूसहस्रनाम, रुद्रसुक्त, कृष्णालहरी, गंगालहरी यांचा प्रचंड अभ्यास त्यांनी केला. हे धर्मसाहित्य त्यांना मुखोद््गत होते. वामनराव चोरघडे यांच्या लेखनचा वारसा त्यांना लाभला. त्यांनी लेखन केलेल्या श्रुतिका, नभोनाट्य यांचे प्रसारण नेहमी नागपूर आकाशवाणीवरून होत असे. मराठी, संस्कृत भाषेमध्ये त्यांचे धर्म अध्यात्मावरील स्वतंत्र लेखनासह संपादित व अनुवादित केलेले त्यांचे १७ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. ३० पेक्षा जास्त पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिली असून वृत्तपत्रात त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. अनेक संस्कृत व मराठी नाटकांमध्ये त्यांनी अभिनयही केला होता.वेद-उपनिषदातील तत्त्व, आद्य शंकराचार्याचे दृष्टांत, ज्ञानेश्वरीतील ओव्या त्यांना पाठ होत्या. त्यांच्या या ज्ञानसाधनेमुळे नानासाहेब शेवाळकर यांनी त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात ज्ञानसाधू ही पदवी बहाल करून त्यांचा सत्कार केला. विदर्भ साहित्य संघाचे सचिव असताना पहिला कीर्तन महोत्सव आयोजित करण्याचे काम त्यांनी केले. लोकमतच्या ‘अध्यात्म’ या सदरात त्यांनी अनेक वर्षे लेखन केले आहे.त्यांनी ज्येष्ठ नागरिक मंडळ (पश्चिम), पेन्शनर्स असोसिएशन, भागवत सेवा समिती, विनोबा विचार केंद्र, हनुमान मंदिर माधवनगर या संस्थांचे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. त्यांना २०१० साली महाराष्ट्र शासनातर्फे कविकुलगुरू कालिदास संस्कृत साधना पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अनेक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यू