स्कूल रॅँकिंग सर्व्हेत ग्वाल्हेरचे ‘द सिंधिया’ स्कूल अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST2020-12-15T04:26:10+5:302020-12-15T04:26:10+5:30
नागपूर : ग्वाल्हेर येथील द सिंधिया स्कूलने जगातील सर्वात मोठ्या स्कूलचे नामांकन मिळविले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या स्कूल रॅँकिंग ...

स्कूल रॅँकिंग सर्व्हेत ग्वाल्हेरचे ‘द सिंधिया’ स्कूल अव्वल
नागपूर : ग्वाल्हेर येथील द सिंधिया स्कूलने जगातील सर्वात मोठ्या स्कूलचे नामांकन मिळविले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या स्कूल रॅँकिंग सर्व्हेत ही शाळा भारतात मुलांचे सर्वात मोठे बोर्डिंग स्कूल ठरली आहे. ‘ईडब्ल्यूआयएसआर’ची रँकिंग जगात सर्वात मोठी रँकिंग मानली जाते. ‘द सिंधिया’ स्कूलने सलग दुसऱ्यांदा प्रथम स्थान पटकाविले असल्याची माहिती पॅस्टोरल केअरच्या उपप्राचार्य स्मिता चतुर्वेदी यांनी दिली. सोमवारी ऑनलाईन घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी यासंदर्भात सांगितले.
यावेळी सांगण्यात आले की, ओव्हरऑल रँकिंगमध्येसुद्धा शाळेने प्रथम क्रमांक मिळविला आहे. ग्वाल्हेरचे ‘द सिंधिया स्कूल’ १२३ वर्षे जुने मुलांचे बोर्डिंग स्कूल आहे. स्कूलने ओव्हरऑल रॅँकिंगमध्ये टॉप करण्याबरोबरच उत्तम शैक्षणिक सुविधा, शिक्षकांचे कल्याण व विकास, प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व व व्यवस्थापनाचे गुण अशा चौफेर गुणांच्या आधारे स्कूलने अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, मला विश्वास आहे की सिंधिया स्कूल देशातील अन्य शाळांसाठी एक रोल मॉडेल ठरेल आहे. बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे उपाध्यक्ष पद्मभूषण विजेते व सिंधिया स्कूलचे माजी विद्यार्थी राजेंद्र एस. पवार म्हणाले, शाळेचा शैक्षणिकस्तर सुधारण्यासाठी जे प्रयत्न केले गेले होते, त्याला यश आले आहे. अनेक आव्हानांचा सामना करून शाळेने प्रगती केली आहे.
प्राचार्य डॉ. एम.डी. सारस्वत म्हणाले, हे वर्ष कोरोना महामारीमुळे अतिशय आव्हानात्मक राहिले. आम्हाला गर्व आहे की सर्वच बोर्डिंग स्कूलमध्ये सिंधिया स्कूलपेक्षा कुठलीही दुसरी सुरक्षित स्कूल नाही. सिंधिया स्कूलची स्थापना १८९७ मध्ये राजा माधवराव सिंधिया यांनी केली. ही शाळा ऐतिहासिक ग्वालियर फोर्टमध्ये आहे.