शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

गुरु चरण प्रीत मोरी लागी रे..!

By admin | Updated: June 5, 2014 01:03 IST

संगीतावर अपार प्रेम असणारे वैदर्भीय ख्यातनाम गायक पं. शरद सुतवणे यांना स्वरवेदतर्फे नुकतीच संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा कार्यक्रम हिंदी मोरभवन, सीताबर्डी येथे विदर्भ हिंदी

स्वरश्रद्धांजली : गुरुवर्य पं. शरद सुतवणे यांची आठवण नागपूर : संगीतावर अपार प्रेम असणारे वैदर्भीय ख्यातनाम गायक पं. शरद सुतवणे यांना स्वरवेदतर्फे नुकतीच संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात  आली. हा कार्यक्रम हिंदी मोरभवन, सीताबर्डी येथे विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात पार पडला. पंडितजींचे शिष्य ज्येष्ठ गायिका प्रभा घुले,  गायत्री कानिटकर, प्रमोदिनी क्षत्रिय, कैवल्य केजकर, रितेश तानिलवार, स्वास्तिका सोनी यांनी शास्त्रीय राग संगीतासह सुगम संगीतातील नाट्यगीत,  भावगीत अशा सुमधूर गायनाने गुरुचरणी आपली भावपूर्ण स्वरांजली अर्पण केली. प्रभा घुले या ज्येष्ठ गायिका तसेच पंडितजींच्या निष्ठावान शिष्य. त्यांनी गुरुजींच्या आवडत्या राग कलावतीसह गायनाला प्रारंभ केला. ‘मधुरात आए  आए साजन..’ ही रसिल्या अर्थभावाची बंदिश तेवढय़ाच रसिलेपणाने सादर करून त्यांनी रसिकांना जिंकले. सुरीले स्वरलगाव, उत्तम दमसास आणि  गायनातील समरसता यांची त्यांनी दाद घेतली. सुप्रसिद्ध गायिका गायत्री कानिटकरने राग पुरिया धनश्रीतील प्रसन्न अनुभूतीची बंदिश ‘मुश्किल करो  आसान ख्वाजा मेरी..’चे सादरीकरण केले. कैवल्य केजकर या नवोदित गायकाने तयारीने सादर केलेली तोडीतील ‘ए री माई मोरी गगरीया फोरी..’ ही  बंदिश तर नवोदित गायक रितेश तालिवारने सादर केलेले राग जाैनपुरीचे सादरीकरण श्रवणीय होते. यावेळी सुप्रसिद्ध गायिका प्रमोदिनी क्षत्रिय यांनी  पंडितजींनी स्वरबद्ध केलेल्या ‘वाळली सगळी फुले उरला पण वास तरी..’ आणि ‘अशा घोर रात्री तू जाशी कुठे..’ आदी रचना भावपूर्णतेने सागदर  केल्या. कैवल्यने ‘या भवनातील गीत पुराणे..’ गायत्रीने दादरा व ‘एकला नयनाला विषय तो झाला..’ ही लोकप्रिय नाट्यगीते सादर केली. प्रभाताईंनी  ‘गुरु कृपा तारी..’ ही रचना सादर केली. स्वास्तिका सोनी या युवा गायिकेने ‘संदेस तारो ने किया दिन ढल गया..’ हे गीत मधुरतेने सादर केले. प्रभा घुले  यांनी सादर केलेल्या ‘गुरुचरण प्रित मोरी लागी रे..’ या भैरवीने स्वरांजलीचे समापन केले. स्वरवेदचे संचालक रवी सातफळे - तबला, संदीप गुरमुळे -  संवादिनी यांनी सुरेल सहसंगत केली. आसावरी देशपांडे यांचे निवेदन होते. प्रमोदिनी क्षत्रिय यांनी पं. सुतवणे यांच्या प्रेमळ  व्यक्तित्त्वासह त्याच्या  प्रगल्भ गायन प्रतिभेचा परिचय करून देत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. (प्रतिनिधी)