शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गुंठेवारी नासुप्रकडे अन् शुल्काचा निर्णय मनपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गुंठेवारी विभाग मनपाकडून नासुप्रकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. याबाबतचा अद्यादेश ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गुंठेवारी विभाग मनपाकडून नासुप्रकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. याबाबतचा अद्यादेश लवकरच प्राप्त होईल, असे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी स्पष्ट केले. परंतु अद्याप अध्यादेश प्राप्त झाला नसल्याने नियमितीकरण नोंदणी (स्क्रुटीनी) शुल्क म्हणून एक हजारावरून दोन हजार करण्याच्या प्रस्तावाला मनपा सभेत गुरुवारी मंजुरी देण्यात आली. गुठेवारी नासुप्रकडे देण्याच्या निर्णयावर आमदार प्रवीण दटके, धर्मपाल मेश्राम यांनी नाराजी व्यक्त केली.

महसूल वाढीसाठी भूखंड नियमितीकरण नोंदणी शुल्क तब्बल १५ हजार रुपये आकारण्याचा प्रस्ताव होता. मात्र, स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी याला विरोध दर्शवून शुल्क दोन हजार करण्याची सूचना केली. महापौर दयाशंकर तिवारी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.

७५ हेल्थ पोस्टला मंजुरी

पदभार स्वीकारताच महापौर दयाशंकर तिवारी यांनी शहरात मनपाची ७५ हेल्थ पोस्ट निर्माण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. हेल्थ पोस्टमध्ये रुग्णांची तपासणी व औषधोपचार (ओपीडी) केले जाईल. रुग्णाला गरज पडल्यास जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था संबंधित हेल्थ पोस्टमध्ये असेल. ७५ हेल्थ पोस्टच्या निर्मितीसाठी मनपाला इमारत बांधकाम, वीज बिल आणि पाणी यासाठी येणारा खर्च करावयाचा आहे. उर्वरित डॉक्टर, परिचारिका, औषधी यासाठी लागणारा संपूर्ण खर्च संबंधित सामाजिक संस्था करणार आहेत.