गुमगाव परिसराला पावसासह वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:08 IST2021-05-20T04:08:42+5:302021-05-20T04:08:42+5:30

गुमगाव : हिंगणा तालुक्यातील गुमगाव परिसराला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक जोरदार पावसासह ...

Gumgaon area hit by storm with rain | गुमगाव परिसराला पावसासह वादळाचा तडाखा

गुमगाव परिसराला पावसासह वादळाचा तडाखा

गुमगाव : हिंगणा तालुक्यातील गुमगाव परिसराला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक जोरदार पावसासह अनेक गावांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे .नजीकच्या वागदरा येथील अनेक घरांवरील टिनाचे पत्रे उडून गेल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मंगळवारी सायंकाळी परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला. वादळाचा तडाखा एवढा प्रचंड होता की वागदरा (नवीन गुमगाव) येथील संदीप डोंगरवार ,विजय चौबे, गजानन निवांत, कवडू सरोकर, दीपक डोंगरवार, विजय निमजे, रंजना पडवे, अमर नागपुरे, हनुमान झाडे, सचिन सहारे, दीपक मंदे, अशोक गांजुडे आदींच्या घराचे नुकसान झाले. सचिन सहारे यांच्या घरावरील पत्रे उडून डोक्यावर दगड पडल्याने जखमी झाला. वादळाचा तडाखा बसलेल्या आपादग्रस्तांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Gumgaon area hit by storm with rain