शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

Nagpur: ५ कोटींपर्यंत होणार गुलालाची विक्री! हर्बल गुलालाला जास्त मागणी, बाजारपेठांमध्ये संचारला उत्साह

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 18, 2024 20:33 IST

Nagpur News: यंदा होलिका दहन २४ मार्च आणि धुलिवंदन २५ मार्चला असून लोक होळीच्या रंगात रंगलेले दिसतील. काही वर्षांपासून होळीप्रेमी रंगाच्या तुलनेत गुलालाला जास्त प्राधान्य देत आहेत.

- मोरेश्वर मानापुरेनागपूर - यंदा होलिका दहन २४ मार्च आणि धुलिवंदन २५ मार्चला असून लोक होळीच्या रंगात रंगलेले दिसतील. काही वर्षांपासून होळीप्रेमी रंगाच्या तुलनेत गुलालाला जास्त प्राधान्य देत आहेत. होळीनिमित्त बाजारात प्रचंड उत्साह असून ५०० टनांहून अधिक गुलालाची उधळण अर्थात ५ कोटींहून अधिक गुलाल विक्रीची व्यापाºयांना अपेक्षा आहे.

नागपुरात लहानमोठे ३० उत्पादकहोळीला एक आठवड्याचा कालावधी उरला असून गुलाल उत्पादक आणि रंग विक्रेत्यांची तयारी जोरात आहे. गेल्या आठवड्यात नागपुरात दोनदा वादळी पाऊस आल्याने गुलाल उत्पादक आणि विक्रेत्यांची अडचण झाली. तसे पाहता गुलालाची निर्मिती तीन महिने आधीपासूनच सुरू होते. गुलाल २५ किलोच्या बोरीत विकला जातो. नागपुरात ७ ते ८ मोठे २५ हून अधिक लहान गुलाल उत्पादक आहेत. नागपुरातून संपूर्ण विदर्भ, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात गुलालाची विक्री होते. घाऊक बाजारात दर्जानुसार गुलाल ६० ते १०० रुपये किलो आणि किरकोळ बाजारात १५० रुपयांपर्यंत भाव आहेत. 

उत्पादक सीताराम काचुरे म्हणाले, नागपुरात गुलालाची वर्षभर विक्री होते. परंतु होळीला सर्वाधिक विकला जातो. आर्गेनिक गुलाल आरारोट आणि मका पीठापासून तयार होतो. हा गुलाल २०० रुपये किलोपर्यंत विकला जातो. यामध्ये उच्च दर्जाचा रंग आणि सुगंधित द्रव्याचा उपयोग केला जातो. कमी किमतीच्या गुलालात डोलोमाईट पावडरचा उपयोग होतो. त्यामुळे शरीराला इजा होऊ शकते. गुलाल जवळपास १२ रंगात तयार होतात.

तीन महिन्यांपासून गुलालाची निर्मितीगुलालाची निर्मिती तीन महिने आधीपासून सुरू होते. होळी सणात गुलाल उत्पादनातून २०० हून अधिक लोकांना रोजगार मिळतो. आरारोट अथवा मका पीठ रंगात भिजवून खुल्या मैदानात उन्हात वाळवावे लागते. 

विविधरंगी गुलाल दीडपटीने महागगुलाल तयार करण्यासाठी लागणारे आरारोट, रंग आणि ऑईल महागल्याने यंदा किमती दीडपटीने वाढल्या आहेत. याशिवाय क्रूड ऑईलच्या किमती वाढल्यामुळे प्लास्टिक दाणेही महाग झाले आहेत. दाण्यापासून तयार झालेल्या प्लास्टिच्या पिचकारीसह अन्य वस्तूंच्या किमती दुपटीवर गेल्या आहेत. जास्त किमतीत खरेदी करावे लागत असल्याचे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. विविध कंपन्यांचे रंग १० ते ५० ग्रॅम आणि गुलाल ५० ते १०० ग्रॅम पॅकिंगमध्ये आहेत.

हर्बल गुलालाला सर्वाधिक मागणीलोक आता आरोग्यप्रती सजग झाले आहेत. त्यामुळे पारंपारिक आणि हर्बल गुलालाला जास्त मागणी आहे. हर्बल गुलाल साध्याच्या तुलनेत ३० टक्के महाग असतो. त्याला लागणारा आरारोट, रंग, ऑईल आणि मजूरी वाढली आहे. यावर्षी मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याचे उत्पादकांचे मत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरHoliहोळी 2023