गेस्ट हाऊसेसची तपासणी व्हावी
By Admin | Updated: June 6, 2014 00:59 IST2014-06-06T00:59:10+5:302014-06-06T00:59:10+5:30
शहरात गेस्ट हाऊसेसला हॉटेलच्या स्वरूपात चालविण्यात येत असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शासनाने गेस्ट हाऊसेसची तपासणी करावी, अशी मागणी नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स

गेस्ट हाऊसेसची तपासणी व्हावी
‘एनआरएचए’ची मागणी : हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंता
नागपूर : शहरात गेस्ट हाऊसेसला हॉटेलच्या स्वरूपात चालविण्यात येत असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शासनाने गेस्ट हाऊसेसची तपासणी करावी, अशी मागणी नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनने (एनआरएचए) येथे केली.
रहिवासी भागात सुरू असलेल्या गेस्ट हाऊसचा विरोध करण्यात आला. असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष प्रकाश त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली सेंट्रल एव्हेन्यू येथील एका हॉटेलमध्ये नुकतीच पार पडली.
त्रिवेदी यांनी सांगितले की, गेस्ट हाऊसमध्ये हॉटेलसारख्या संपूर्ण सुविधा असतात, पण हॉटेल व्यावसायिकांद्वारे चुकता करण्यात येणारा व्हॅट, लक्झरी व मनोरंजन कर ते चुकता करीत नाही. परवान्याविना व्यवसाय करण्याच्या उद्देशाने या हॉटेल्सला गेस्ट हाऊसच्या स्वरूपात चालविले जाते. त्यामुळे नोंदणीकृत हॉटेल्सला नुकसान सोसावे लागते. शिवाय शासनाला महसूल मिळत नाही.
सभेत सदस्यांनी मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्यावर चिंता व्यक्त केली. त्यामुळे शहरातील अनेक हॉटेल्सच्या पोलीस परवान्याचे गेल्या सात ते आठ वर्षांंंंपासून नूतनीकरण झालेले नाही. तसेच अन्न व सुरक्षा प्रशासन विभागाच्यावतीने अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार वार्षिक रिटर्न भरण्यासाठी देण्यात येणार्या नोटीसवर चिंता व्यक्त केली.
सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी सांगितले की, या संदर्भात मनपा आयुक्त श्याम वर्धने यांची भेट होऊ शकली नाही. पण संबंधित विभागातील अधिकार्यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. यावेळी संतोष गुप्ता, इंदरजितसिंग बवेजा, दीपक पांडे, विनोद जोशी, एस.वाय. वरंभे, राजन मुलानी, दीपक खुराणा, महेश त्रिवेदी, नितीन त्रिवेदी, राजेश किलोर, सी.के. चौरसिया, विजय सावरकर, विनोद चौरसिया, मूर्तजा फिदवी, विजय जयस्वाल, अजय जयस्वाल, डी.एस. तुली, मनीष जयस्वाल, के.एस. शर्मा उपस्थित होते. (प्रतिनिधी)