जीएसटी सरळ व व्यावहारिक असावा
By Admin | Updated: November 7, 2016 02:46 IST2016-11-07T02:46:47+5:302016-11-07T02:46:47+5:30
व्यापारी व व्यावसायिकांना कर भरण्यास सुविधा व्हावी आणि सुलभ व व्यावसायिक अशी जीएसटीची रचना असावी,

जीएसटी सरळ व व्यावहारिक असावा
मेहाडिया यांचे प्रतिपादन : ‘एनव्हीसीसी’चे दिवाळी मिलन
नागपूर : व्यापारी व व्यावसायिकांना कर भरण्यास सुविधा व्हावी आणि सुलभ व व्यावसायिक अशी जीएसटीची रचना असावी, असे मत नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष प्रकाश मेहाडिया यांनी येथे व्यक्त केले.
‘एनव्हीसीसी’तर्फे दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन सिव्हिल लाईन्स येथील चेंबरच्या परिसरात शनिवारी करण्यात आले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग, अशोक धवड, जयप्रकाश गुप्ता, नगरसेवक दुनेश्वर पेठे, प्रगती पाटील, सुनील अग्रवाल, दयाशंकर तिवारी, संदीप जोशी यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त जगताप, पोलीस निरीक्षक खांडेकर, गुलमोजावार, वैभव जाधव तसेच रफीक शेख, राजेंद्र पवार आणि चेंबरचे माजी अध्यक्ष बी.सी. भरतीया, दीपेन अग्रवाल, गोविंदलाल अग्रवाल, ताराचंद रावका, गोविंदलाल सारडा, रजनीकांत गरीबा, मथुराप्रसाद गोयल, प्रकाश वाधवानी, हेमंत खुंगर, जगदीश बंग यांच्यासह राजन अग्रवाल, नवलीन खुराना आणि अग्रसेन मंडळाच्या अध्यक्षा उर्मिलाबेन अग्रवाल यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि दुपट्टे देऊन सत्कार करण्यात आला.
चेंबरचे मानद सल्लागार निखिल अग्रवाल, राजेश शाह, जयंत पेंढरकर, हरनिश गढिया आणि जुल्फेश शाह यांना सन्मानित करण्यात आले. चेंबरशी संलग्न व्यावसायिक संघटनांचे अध्यक्ष व सचिवांचा सत्कार उपाध्यक्ष हेमंत गांधी, अर्जुनदास आहुजा, राजू व्यास आणि दिवाळी स्नेहसंमेलनाचे संयोजक अश्विन मेहाडिया यांच्या हस्ते करण्यात आले.
संचालन सचिव जयप्रकाश पारेख व सहसचिव फारुकभाई अकबानी यांनी आभार मानले. यावेळी सचिन व सुरभी ढोमणे यांच्यातर्फे संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमात चेंबरचे कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव रामअवतार तोतला, संजय के. अग्रवाल, अभय अग्रवाल, अभिषेक झा, गजानन गुप्ता, ज्ञानेश्वर रक्षक, प्रभाकर देशमुख, कमलेश समर्थ, लक्ष्मीकांत अग्रवाल, मनोज लटूरिया, महेशकुमार कुकडेजा, निखिलेश ठक्कर, प्रताप मोटवानी, राजेश ठक्कर, राजू माखिया, रवींद्र गुप्ता, संजयराज मोढ सराफ, सतीश बंग, शंकर सुगंध आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)