शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीचा शिमगा !

By admin | Updated: March 5, 2015 01:37 IST

जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपने महापालिकेच्या सभेत बहुमताच्या जोरावर

नागपूर : जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपने महापालिकेच्या सभेत बहुमताच्या जोरावर करवाढीवर शिक्कामोर्तब केले. करवाढीला काँग्रेसने जोरदार विरोध केला. मात्र, महापौरांनी ‘बुरा न मानो होली है’चा आधार घेत सभा गुंडाळली. यामुळे पुढील आर्थिक वर्षात मालमत्ता करात सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. होळीच्या पर्वावर नागपूरकरांवर करवाढीच्या नावाने शिमगा करण्याची वेळ आली आहे.करवाढीवर शिक्कामोर्तब करतानाच नागपूरकरांवर चार नव्या करांचा बोझा टाकण्यात आला आहे. हे चारही कर मालमत्ता करात समाविष्ट केले जातील. ही दरवाढ १ एप्रिल २०१५ पासून लागू होईल. बुधवारी महापालिकेच्या सभेत करवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपानेही जोरदार विरोध केला. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात विरोधकांनी महापौरांच्या आसनासमोर येत तीव्र विरोध केला. सरकार विरोधात घोषणाबाजी केली. विरोधकांच्या विरोधानंतरही महापौर प्रवीण दटके यांनी काही सुधारणांसह करवाढीवर शिक्कामोर्तब केले. सोबतच कुठलीही करवाढ होणार नाही, असा दावाही केला. सभेचे कामकाज सुरू होताच महापौर दटके यांनी प्रश्नकाळ पुकारला. अ‍ॅड. संजय बालपांडे यांनी नगररचना विभागाशी संबंधित प्रश्न उपस्थित केला असताना विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी कर वाढीच्या प्रस्तावावर सत्ताधाऱ्यांनी आधी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरचे आहेत. या दोन्ही नेत्यांशी चर्चा करून ही दरवाढ रोखण्यात यावी, अशी मागणी करीत ठाकरे महापौरांच्या आसनासमोर आले. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी व बसपाचे नगरसेवकही वेलमध्ये आले व जोरदार नारेबाजी करू लागले. विरोधकांच्या नारेबाजीमुळे महापौरांनी काहीवेळासाठी सभा स्थगित केली. काहीवेळांनी सभा सुरू होताच विरोधकांनी पुन्हा नारेबाजी सुरू केली. या गोंधळात महापौरांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करून घेतले. रेडिरेकनरच्या आधारावर वार्षिक किराया मूल्य (एएलव्ही) तयार करण्यात आले आहे. यामुळे दरवर्षी कराचा बोझा वाढत जाईल, असा विरोधकांचा आरोप आहे. झोपडीधारकालाही ५०० रुपये कर ४पूर्वी झोपडपट्टीधारकांना मालमत्ता कराची किमान १०० ते ३०० रुपयांची डिमांड दिली जात होती. आता शहरातील कोणत्याही मालमत्तेला ५०० रुपयांपेक्षा कमीची डिमांड दिली जाणार नाही. झोपडीधारकालाही ५०० रुपये कर भरावा लागेल. या संबंधीच्या प्रस्तावालाही सभेत मंजुरी देण्यात आली.