शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ग्राउंड रिपोर्ट - नागपुरातील ‘हायप्रोफाइल’ लढतीची रंगत वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 7:55 AM

बसप, बीआरएसपी, वंचितचाही जोर। संघ परिवारासह भाजप ताकदीने मैदानात

कमलेश वानखेडे

नागपूर - भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिंगणात असलेल्या नागपूरच्या ‘हायप्रोफाइल’ जागेकडे राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भंडारा- गोंदियाच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये सामील झालेले नाना पटोले त्यांना आव्हान देत आहेत. बसपा, वंचित बहुजन आघाडी व बीआरएसपीनेही आपला ग्राफ वाढविण्यासाठी ताकद लावली आहे.

गडकरी प्रचारात त्यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत आहेत, तर काँग्रेसचे नाना पटोले हे नेत्यांचा विकास झाल्याचे सांगत भाजपाला लक्ष्य करीत आहेत. भाजप देशहित, विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढत असून काँग्रेसची भिस्त सामाजिक समीकरणांवर असल्याचे दिसते. भाजपासह संघ परिवार एकदिलाने ‘गड’ सर करण्यासाठी उतरला आहे. तर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीही तूर्तास दबा धरून बसली आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ९ एप्रिल रोजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेचा ‘मास्टरस्ट्रोक’ भाजपा मारणार आहे. दुसरीकडे काँग्रेससाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची एखाद दुसरी सभा वगळता स्टार प्रचारक फिरकलेले नाहीत. गुरुवारी राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी सभा घेत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.बहुजन समाज पक्षाने बाहेरचा उमेदवार देण्याची प्रथा यावेळी खंडित केली. नगरसेवक मोहम्मद जमाल यांना हत्तीवर स्वार केले. शिवाय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्या शुक्रवारच्या सभेने ‘हत्ती’ धावण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रदेश सरचिटणीस सागर डबरासे यांच्यावर डाव लावला आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि खा. असदुद्दीन ओवेसी यांनी नागपुरात जाहीर सभा घेत प्रचाराची धुरा सांभाळली. बसपाला खिंडार पाडत ‘बीआरएसपी’ हा नवा पक्ष स्थापन करणारे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने रिपब्लिकन मते खेचण्यासाठी जोर लावताना दिसत आहेत. अ‍ॅड. श्रीहरी अणे, माजी आ. अ‍ॅड. वामनराव चटप यांच्यासह विदर्भवादी पक्ष व संघटनांचे बळ त्यांच्या कामी लागले आहे.नागपूरच्या ‘मिहान’चा जुन्या मुख्यमंत्र्यांनी फक्त ‘बँडबाजा’ वाजविला. आम्ही प्रत्यक्षात स्वप्न साकार केले. अवघ्या तीन वर्षात मेट्रो धावली. आयआयएम, एम्स, एमएनएसयू, ट्रीपल आयटी, जीईसी एकापाठोपाठ झाले सुरू झाले. युवकांना रोजगार देण्याचे लक्ष्य पूर्ण केले.- नितीन गडकरी, भाजपापाच वर्षांत शहराला खोदण्याचे काम केले. सिमेंट रस्त्यांमुळे मनपावर कर्जाचा डोंगर वाढला. प्रकल्पाच्या नावाखाली मोक्याच्या जागा बळकावल्या. नवीन उद्योग न येता मिहानमधील उद्योग बंद पडले. लोकांना नोकऱ्या तर मिळाल्या नाहीत. नेमका विकास कुणाचा झाला, हाच खरा प्रश्न आहे.-नाना पटोले, काँग्रेसप्रमुख उमेदवारनितीन गडकरी । भाजपनाना पटोले । काँग्रेसमोहम्मद जमाल । बसपकळीचे मुद्देभाजपासह संघ परिवार ‘गड’ सर करण्यासाठी एकदिलाने विकासाचा अजेंडा घेऊन उतरला आहे. समाज घटकांवरही लक्ष केंद्रित आहे.हायकमांडचा वॉच असल्याने काँग्रेसमधील गटबाजी दबा धरून बसली आहे. कार्यकर्ता पक्षाच्या यंत्रणेची वाट न पाहता राबताना दिसतो आहे.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक