शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
2
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
3
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
4
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
5
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
6
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
7
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
8
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
9
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
10
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
11
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
12
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
13
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
14
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
15
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
16
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
17
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
18
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
19
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

नवरदेवाने घोड्यावरूनच भरला ५०० रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 00:52 IST

Groom paid a fine नंदनवन येथे शुक्रवारी घाेड्यावर स्वार नवरदेव विवाहस्थळाकडे जात होता. त्याने फेटा, शेरवानी, गॉगल आदी ऐटीत जात होता. मात्र, मास्क घातला नव्हता. मनपाच्या न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॅड (एनडीएस)च्या जवानांना हा नवरदेव विनामास्क दिसताच, त्याच्यावर नियमानुसार ५०० रुपये दंड ठोठावला.

ठळक मुद्देमास्क न घालणे पडले भारी : एनडीएसची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विवाह हा प्रत्येक नवरदेवाच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा सोहळा. यात घोड्यावर बसणे, मुंडावळ्या बांधण्यापासून ते आवडीचे वस्त्र परिधान करण्याचे शौक पूर्ण केले जातात. या सगळ्यांसोबतच कोरोना संक्रमणकाळात मास्क घालणे अत्यावश्यक झाले आहे. मास्क न घातल्यास कोरोना संक्रमणासोबतच कारवाईची भीतीही लागलेली राहते. शुक्रवारी अशाच एका नवरदेवाला मास्क न घालणे भारी पडले.

नंदनवन येथे शुक्रवारी घाेड्यावर स्वार नवरदेव विवाहस्थळाकडे जात होता. त्याने फेटा, शेरवानी, गॉगल आदी ऐटीत जात होता. मात्र, मास्क घातला नव्हता. मनपाच्या न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॅड (एनडीएस)च्या जवानांना हा नवरदेव विनामास्क दिसताच, त्याच्यावर नियमानुसार ५०० रुपये दंड ठोठावला. नवरदेवासोबतच मास्क नसलेल्या अन्य तीन-चार वरातींवरही दंडाची कारवाई केली. त्यानंतर वरातीत सहभागी सर्वच जण सजग झाले. सर्वांनी मास्क तातडीने लावले. यावरून क्षण कोणतेही असो, मास्क अनिवार्य आहे, हा धडा मिळाला. मास्क कोरोना संक्रमणासोबतच दंडापासूनही तुमचा बचाव करतो.

मात्र, कोरोना संक्रमणाची लाट ओसरल्यापासून नागरिकांनी मास्क घालणे कमी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, धोका आणखी वाढण्याची भीती आहे. एनडीएसनेही नाममात्र सहा लोकांवर कारवाई करत तीन हजार रुपये दंड वसूल केला. आतापर्यंत मास्क न घालणाऱ्या ३८,५९९ नागरिकांवर कारवाई करताना त्यांच्याकडून १ कोटी ७६ लाख ५८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

एनडीएसकडून शहरात रस्ता, फुटपाथवर निर्माण सामुग्री ठेवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. शनिवारी कावरापेठ, शांतीनगरमध्ये बिल्डिंग मटेरियल ठेवणाऱ्यांवर दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आले. उत्तर अंबाझरी मागार्वरील अतिक्रमणधारकांवरही कारवाई करण्यात आली. सतरंजीपुरा झोनमध्ये रस्त्यावर विना परवानगी मंडप बांधणाऱ्यांवर एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. यासोबतच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा प्रतिष्ठानांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका