शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

पूरग्रस्त शेतकऱ्यांनी केंद्रीय समितीसमोर मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 9:23 PM

केंद्र्राकडून आलेली समिती सध्या विदर्भाच्या पाहणी दौऱ्यावर असून पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेत आहे. या चमूने शुक्रवारी नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र्राकडून आलेली समिती सध्या विदर्भाच्या पाहणी दौऱ्यावर असून पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेत आहे. या चमूने शुक्रवारी नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली. शेताच्या नुकसानीचाही आढावा घेतला. शनिवारी ही चमू भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात होती. दौऱ्यानंतर रविवारी आयुक्त कार्यालयात आढावा बैठक होेणार आहे.सहा सदस्यीय या समितीच्या दोन चमू करण्यात आल्या असून एका चमूने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात पाहणी केली. तर दुसऱ्या चमूने नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील गावकरी आणि शेतकऱ्यांना भेटून आढावा घेतला. समितीने शुक्रवारी नागपूर जिल्ह्यातील कामठी, पारशिवनी, मौदा तालुक्यातील प्रभावित गावांना भेटू देऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि माहिती जाणून घेतली. तर शनिवारी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भेटी दिल्या.शुक्रवारी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी या समितीने विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून नुकसानाचा आढावा घेतला. त्यानंतर समितीचे सदस्य महेंद्र सहारे, एस.एस.मोदी आणि आर. पी. सिंह यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह कामठी तालुक्यातील सोनेगाव गाठले. या गावामध्ये पुरामुळे १५५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. ३५४ घरांपैकी ११४ घरांचे नुकसान झाले. गावकऱ्यांनी समितीसमोर पुनर्वसनाची मागणी केली. धानाचे पीक हातून गेल्याची व्यथा गजानन झोड या शेतकऱ्याने मांडली. नामदेव राऊत यांचे संपूर्ण घरच पुरात वाहून गेले. मधुकर चौधरी यांची गाय वाहून गेली. अशोक महल्ले यांच्या संपूर्ण पऱ्हाटीचे नुकसान झाले.यानंतर समितीने निलज गावाला भेट देऊन समस्या समजून घेतल्या. जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे, सरपंच सुभाष नाकाडे, उपसरपंच रवींद्र दोडके आदींनी पारशिवनी तालुक्यातील सिंगारदीप गावाच्या पुनर्वसनाची मागणी केली. इस्लामपुर माथनी गावातील नुकसानाचाही आढावा समितीने घेतला. यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, उपविभागीय अधिकारी जोगद्र कट्यारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, पारशिवनीचे तहसीलदार वरुण सहारे, गटविकास अधिकारी बनमोटे आदी सहभागी होते.नॉनस्टाप पहाणीदुपारी १२.३० वाजता कामठी तालुक्यातील गावांपासूृन सुरू झालेली पहाणी रात्री ८.३० पर्यंत सुरूच होती. दौऱ्यातील अखेरचे गाव मौदा तालुक्यातील होते. येथे तर समितीने अंधारात भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली आणि परिस्थिती जाणून घेतली.विभागात ८८, ८६४ हेक्टर कृषी क्षेत्राचे नुकसानविभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागपूर विभागातील ३४ तालुक्यांमधील ८८ हजार ८६४ हेक्टर कृषी क्षेत्राचे पुरामुळे नुकसान झाल्याची माहिती दिली. विभागातील २३ हजार घरांची पडझड झाली असून धान, कापूस सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी