विश्वनाथ प्रताप सिंह यांना भावपूर्ण अभिवादन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:09 IST2020-11-28T04:09:34+5:302020-11-28T04:09:34+5:30

नागपूर : जनता दल (सेक्युलर) नागपूर शहरच्यावतीने माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. ...

Greetings to Vishwanath Pratap Singh () | विश्वनाथ प्रताप सिंह यांना भावपूर्ण अभिवादन ()

विश्वनाथ प्रताप सिंह यांना भावपूर्ण अभिवादन ()

नागपूर : जनता दल (सेक्युलर) नागपूर शहरच्यावतीने माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता दल सेक्युलरचे शहर अध्यक्ष रमेश शर्मा होते. यावेळी महासचिव डॉ. विलास सूरकर, विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष मुन्ना शेख, अविनाश निमकर उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी ओबीसी, अल्पसंख्यांक, दलित आणि गोरगरिबांसाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. नागपुरात माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री नितीन राऊत, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन सादर करण्यात आले होते. परंतु अद्याप त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे विश्वनाथ प्रताप सिंह यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कार्यक्रमाला के. के. कदिर, शिवराज परोपटे, विजय खोब्रागडे़, वसंत डेकापूरवार, तारा मेश्राम, आनंद मोटघरे, तानाजी कडवे,आशा निमगडे, संगीता शेंडे, मोरेश्वर गभणे, सुरेश मोटघरे, अनिता सोमकुवर, रुक्मिणी शेंडे, संजय पिसे, सीता शनेश्वर,देवांगी कुमेरिया, मुरलीधर कुमेरिया उपस्थित होते.

.............

Web Title: Greetings to Vishwanath Pratap Singh ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.